CNG-PNG Rates : तुम्ही CNG वाहन (CNG Vehicle) चालवत असाल किंवा तुमच्या घरी PNG कनेक्श असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच CNG-PNG च्या दरात कपात होऊ शकते. यासाठी केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे CNG-PNG च्या वाढत्या किंमतीला काही प्रमाणात ब्रेक लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या किंमतीने बिघडलं बजेट
गेल्या काही दिवसांत CNG आणि PNG च्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच महागाईची (Inflation) झळ सोसणाऱ्या सामान्य जनतेचं बजेट पार कोलमडून गेलं आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने अशा स्थितीत सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी इंडस्ट्रिज किंवा उद्योगांकडून काही प्रमाणात नैसर्गिक वायू शहर गॅस वितरण कंपन्यांना (City Gas Companies) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्हीच्या किमती खाली येण्याची शक्यता आहे.


पेट्रोलियम मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्याचं स्पष्ट केलं आहे. गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना घरगुती उत्पादित गॅसचं वाटप वाढवलं जाणार आहे. मुंबईत महानगर गॅस लिमिटेड (MGL) आणि दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) या गॅस वितरक कंपन्यांचं वाटप 17.5 दशलक्ष घनमीटरवरून 278 दशलक्ष घनमीटर करण्यात आले आहे.


शहर गॅस वितरक कंपन्यांना घरगुती गॅसचा पुरवठा आता उपलब्धतेच्या आधारावर किंवा सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या वाहतुकीसाठी गेलला केलेल्या वाटपाच्या आधारावर केला जाईल, असंही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे. 


सध्या शहर गॅस वितरक कंपन्यांना केलेल्या वाटपातून 83 टक्के मागणी पूर्ण केली जात होती. तर उर्वरित पुरवठ्यासाठी एलएनजी चढ्या दराने आयात केला जात होता. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र, वाटप वाढल्यानंतर आता कंपन्या 94 टक्के मागणी पूर्ण करू शकतील.


मुंबईत सीएनजी दरात वाढ
गेल्या एका वर्षात सीएनजीच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. सीएनजीचे दर पेट्रोलच्या दरांपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच महिन्यात सीएनजीच्या दरात प्रती किलो 6 रुपये तर पीएनच्या दरात 4 रुपये प्रती यूनिट वाढ झाली आहे. मुंबईत सीएनजीची किंमत 49.40 पैसे प्रति किलो होती, जी आता वाढून 86 रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे. 


दिल्लीतही वाढत्या किंमती
दिल्लीतही इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सीएनजी किंमतीत 4 रुपये प्रतिकिलो इतकी वाढ केली होती. त्यामुळे सीएनजीचे  दर 75.61 पैसे इतके झाले आहेत.