नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित महासचिव प्रियांका गांधी यांनी सात समुद्रा पार असून आपल्या राजकीय खेळीला सुरूवात केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांनी अमेरिकेतूनच उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या एक डझन नेत्यांकडून फोनवरून आशीर्वाद, सहकार्य आणि मार्गदर्शन मागितले. त्या आपल्या मुलीवरील उपचारासाठी सध्या अमेरिकेत आहेत. आता ही एक डझन मंडळी एकतर राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहेत, वयाने जास्त आहेत, विखुरले गेले आहेत किंवा अगदीच सामान्य आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विशेष म्हणजे यातील काहीजण तर सध्याच्या वेळेत कोणत्याच पार्टीशी संबंध ठेवत नाहीत. अशा लोकांना फोन करुन प्रियांका यांनी मनाचा मोठेपणा तर दाखला आहेच. त्यासोबत जास्तीत जास्त लोकांना जोडण्यास सुरूवात केली आहे. सर्वात आधी कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जोश भरून जनतेत मजबूत पकड बनू शकते हे प्रियांका जाणून आहेत. त्यामुळे देशात परतण्याआधीच प्रियांका यांनी आपल्या पेठाऱ्यातील एक राजकीय डाव खेळला आहे. 



'ती येणार आहे आणि गाजवणार आहे' असे उत्तर प्रदेशचे नेता प्रियांका यांच्याबद्दल म्हणत आहेत. पार्टीच्या नेत्यांना प्रियांका गांधी यांच्यामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा अंश दिसत आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूकीच्या तोंडावर प्रियांका यांना उत्तर प्रदेश पूर्वचा कार्यभाग देत एक महत्त्वाचे राजकीय पाऊल टाकले आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रियांका यांचे येणे हे कार्यकर्त्यांसाठी कोणत्या संजीवनीपेक्षा कमी नाही आहे. पण आता त्यांची जादू चालते की नाही हे जनताच ठरवणार आहे.


कॉंग्रेस उभारण्याचा प्रयत्न 



उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेस कमजोर झाली आहे. 1989 नंतर राज्यातील सत्तेच्या ते बाहेर फेकले गेले. अशातच पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड असलेला गोरखपूर याच पूर्व युपीमध्ये येतो. ज्याची जबाबदारी प्रियांका यांच्या खांद्यावर आहे.