भुवनेश्वर : चीनमध्ये धुमाकूळ घालणारा corona कोरोना व्हायरस आता साऱ्या जगावर दहशतीचं सावट घेऊन आला आहे. विविध राष्ट्रांमध्ये या व्हायरसमुळे चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोनाचे काही संशयित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशा येथून आलेल्या या माहितीनुसार कोरोना संशयित परदेशी महिला रुग्णालयातून पसार झाली आहे. त्यामुळे आता सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. मुळची आयर्लंडची असणारी ही महिली रुग्णालयातून पसार झाली खरी, ज्यानंतर ती एका हॉटेलमध्ये विश्रांती घेताना सापडल्याची माहिती समोर येत आले. 


भुवनेश्वर येथील बीजू पटनायक विमानतळावर ही महिला गुरुवारी दाखल झाली. आयर्लंडहून ती भारतात आली होती. तेव्हाच विमानतळावर करण्यात आलेल्या कोरोनाच्या चाचणीत तिच्यामध्ये या व्हायरसची लक्षणं आढळली. ज्यानंतर तिला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. काही आवश्यक चाचण्या केल्यानंतर तिला कटकच्या एससीबी वैद्यकिय महाविद्याल व रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यास सांगण्यात आलं. 


संबंधित महिला तेथे असतेवेळी रुग्णालयातील कर्मचाही हे इतर रुग्णांची देखभालही करत होते. तेव्हाच संधी साधत या महिलेने रुग्णालयातून पळ काढला. तपासणीसाठी म्हणून या महिलेचा शोध घेतला असता ती रुग्णालयात नसल्याचं लक्षात आलं. ज्यानंतर लगेचच पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली. लगेचच सुरु झालेल्या तपासानंतर ही संशयित महिला एका हॉटेलमध्ये सापडली. 



पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल


कोरोना संशयित या महिलेने साऱ्या यंत्रणेला चांगलंच कामला लावलं होतं. दरम्यान, इथे ही महिला सापडली असली तरीही कोरोनाचं संकट मात्र टळलेलं नाही. त्यामुळे आता या व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. केंद्र सरकारकडूनही नागरिकांना काही सल्ले देण्यात आले आहेत.