नवी दिल्ली :  CoronaVirus चा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करुन मंगळवारी हा लॉकडाऊन अधिकृतपणे संपत आहे. पण, अद्यापही कोरोना विषाणूचा संसर्ग अपेक्षित प्रमाणआत आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे आता याच परिस्थितीवर पुढील निर्णय नेमका काय असणार याविषयीच पंतप्रधान मंगळवारी म्हणजेत  १४ एप्रिलला सकाळी दहा वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतांश राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनची मुदत वाढवण्याच्या निवेदनाचा विचार करचा देशातील लॉकडाऊनही वाढवण्याची घोषणा मोदी करु शकातात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याशिवाय या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्याने चालना देण्यासाठीसुद्धा महत्त्वाची पावलं उचलली जाण्याची घोषणा ते करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


शनिवारी देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत लॉकडाऊनचा कालावधी वाढवूनच कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो यावर एकमत झाल्याची बाब समोर आली. देशात सध्या कोरोना बाधितांचा आकडा ९ हजारांच्याही पलीकडे गेला आहे. त्यामुळे या चिंतेच्या परिस्थितीमध्ये देशाला दिशा दाखवत मोदी नेमकं काय म्हणतात याकडेच प्रत्येकाचं लक्ष असेल 


 


अर्थव्ययवस्थेचा मंदावलेला वेग, त्यातून लॉकडाऊनमुळे बसलेला आर्थिक फटका, येत्या काळाती आर्थिक आव्हानं, बेरोजगारीची झळ अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरही केंद्राकडून काय भूमिका घेतल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशवासियांचे प्राण जितके महत्वाचे आहेत तितकंच अर्थव्यवस्थेला नव्याने चालना देण्याचा सूर पंतप्रधानांनी आळवला होता. तेव्हा आता यायवेळी ते देशवासियांना कोणता संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.