नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रकोप सतत वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 50 हजारांवर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत 3561 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 89 जणांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत देशात 52 हजार 952 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 15 हजार 267 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1783 लोकांचा बळी गेला आहे. सध्या 35 हजार 902 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


कोरोनाचा रिकव्हरी रेट 28.83 टक्के इतका आहे.



 


राज्यात कोरोना बाधितांचा आकडा १६ हजारांपेक्षा जास्त ३०९४ ठणठणीत


 


मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे रुग्णालयांमुळे बेड्सची कमतरता भासू लागली आहे. बेड्सची कमतरता आणि रुग्णालयातील वाढती गर्दी पाहता केंद्र सरकारने नवा निर्णय घेतला आहे. आता कोरोना व्हायरस रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याऐवजी ट्रेनच्या डब्ब्यांमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.


कोरोना संसर्ग रुग्णांमध्ये वाढ होण्याच्या भीतीने आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरस संशयित असलेला रुग्ण किंवा कोरोनाची हलकी लक्षणं असलेला रुग्ण आणि अत्यंत कमी लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर म्हणून कोच वापरण्याचा निर्णय घेतला आहे.


 


कोरोनाशी लढा : रेल्वेच्या डब्यात आयसोलेशन वॉर्ड


 


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांना त्यांच्या लक्षणांनुसार आणि त्यांच्या वैद्यकीय स्थितीप्रमाणे त्या-त्या कोचमध्ये दाखल केलं जाईल. लक्षणं किंवा आरोग्याच्या स्थितीत काही बदल झाल्यास त्यांना नियुक्त केलेल्या केंद्रात किंवा रुग्णालयात पाठविलं जाईल.