कोरोनाशी लढा : रेल्वेच्या डब्यात आयसोलाशन वॉर्ड

कोरोनाशी लढण्यासाठी भारतीय रेल्वे आयसोलेशन कोच बनवण्याच्या तयारीत आहे. देशात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांसाठी येणाऱ्या काळात अधिक आयसोलेशन सेंटर्सची गरज भासू शकते. 

Mar 29, 2020, 16:04 PM IST

त्यामुळे रेल्वेने, रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये आयसोलेशन कोच बनवण्याचं काम सुरु केलं आहे.

 

1/6

रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफसाठी वेगळं केबिन बनवण्यात येत आहे.  

2/6

डब्ब्यांमध्ये सॅनिटायझेशन करुन दोन्ही टॉयलेटचं बाथरुनममध्ये रुपांतर केलं जात आहे. त्याशिवाय नवीन प्रकारचं फ्लोअरिंग केलं जात आहे. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोचमध्ये अंघोळीसाठी बादली आणि हँड शॉवरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

3/6

रुग्णांसाठी कोच तयार करताना एका बाजूचा बर्थ हटवण्यात आला आहे. रुग्णाच्या बर्थ समोरील तीनही बर्थ हटवण्यात आल्या आहेत. बर्थवर चढण्यासाठी असणाऱ्या पायऱ्याही हटवल्या आहेत. 

4/6

आयसोलेशन कोच तयार करण्यासाठी बाथरुम, डब्ब्यांच्या मधली जागा, इतर ठिकाणांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. 

5/6

मेडिकल उपकरणांसाठी डब्ब्यांत इलेक्ट्रिक पॉइंट बनवण्यात आले आहेत. प्रत्येक डब्ब्यात 10 आयसोलेशन वॉर्ड तयार केले जाणार असल्याची माहिती आहे.  

6/6

गरज पडल्यास तीन लाखांपर्यंत आयसोलेशन वॉर्ड रेल्वे तयार करु शकत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.