WHO on Coronaviurs : भारतासह जगभरातील देशांमध्ये कोरोना विषाणूचा (corona update) संसर्ग हळूहळू कमी होत आहे. परंतु त्याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड-19 बाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. त्याचदरम्यान कोरोना व्हायरस (corona virus) कधी संपणार? हा असा एक प्रश्न आहे ज्याचे उत्तर संपूर्ण जगाला जाणून घ्यायचे आहे. या प्रश्नाचे उत्तरही हळूहळू समोर येत आहे आणि ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना महामारीचा अंत जवळ आल्याचे मान्य केले आहे. (coronavirus pandemic is not over but yes end is nea say WHO)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महामारी संपलेली नाही, पण...: WHO


Who महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोविड-19 महामारी संपलेली नाही, पण हो, शेवट जवळ आला आहे. साथीच्या रोगामुळे अजूनही दर आठवड्याला 10,000 मृत्यू होत आहेत. तसेच चीनमधून (china corona) उद्भवलेल्या या धोकादायक व्हायरसमुळे 6,525,964 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण संक्रमित लोकांपैकी 595,318,378 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या (corona virus) नवीन रुग्णांमध्ये घट झाली असून संसर्गाची तीव्रताही देखील कमी झाली आहे.


​सांभाळून पुढे जाण्याची वेळ


डब्ल्यूएचओ (who) प्रमुख म्हणाले की, कोरोना (corona news) रोखण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत. हीच वेळ आहे जेव्हा संपूर्ण जगाला सतर्क राहावे लागेल. आता कठोर परिश्रम आणि वेळ सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे. कारण आता थोडी काळजी घेतली तर आपण कोरोना व्हायरसपासून (coron virus) मुक्त होऊ. या आपल्या मेहनतीचे सर्वांना फळ मिळेल.  


वाचा : WhatsApp Users साठी महत्वाची बातमी ! आता Whatsapp साठी मोजावे लागणार 'एवढे' पैसे ?


संरक्षणासाठी हे उपाय करावे लागतील


टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस  (Tedros Adhanom Ghebreyesus) पुढे म्हणाले, 'याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाने सुरक्षित राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या सोप्या पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. जसे की अंतर राखणे,  मास्क वापरणे. तसेच प्रत्येकाला सुरक्षित राहण्यासाठी लस, चाचण्या आणि वैद्यकीय सल्ला घ्या.