मुंबई :  कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. याच भीतीने वांद्रे येथे हजारोंचा जमाव एकत्र झाल्याची गंभीर घटना समोर आली. कोरोनाच्या संकटात प्रत्येकजण आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न करतोय. कोरोनाने आतापर्यंत देशभरात नऊ हजाराहून अधिक लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. या कोरोनामुळे आता नात्यातील खरेपणा देखील समोर आलं आहे. मुंबईतील नागपाडा परिसरातील एका हॉटेलमध्ये अशोक केसरी कामाला होता. लॉकडाऊनची घोषणा केल्यावर अशोक त्याच्या मित्रांसोबत १४ दिवसांपूर्वी वाराणसीला जायला निघाला. तब्बल १६०० किमीचा प्रवास केला खरा पण.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई ते वाराणसी प्रवास करून आईला घरी फोन केला. घरी गेल्यावर ना आईने दरवाजा उघडला ना दादा-वहिनीने. अशोक स्वतःची तपासणी करूनच घरी गेला. डॉक्टरांनी त्याला १४ दिवस होम क्वारंटाइन राहायला सांगितलं होतं. पण घरी घेत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी त्याला खूप उशिरा एका खासगी दवाखान्यात दाखल केलं. आता त्याची प्रकृती ठिक आहे. 



अशोक १४ दिवसांपूर्वीच त्याच्या मित्रासोबत वाराणसीला निघाला होता. रविवारी सकाळी रेल्वेच्या रूळाची मदत घेत त्याने प्रवास सुरू केला. कँट स्टेशनवर पोहोचल्यावर त्याने आपल्या कुटुंबियांना फोन करून कळवलं. आपल्यासोबत सहा मित्र असल्याची माहिती देखील त्याने दिला. तेव्हा घरच्यांनी हा सगळा प्रकार परिसरातील लोकांना सांगितला. त्यावेळी त्यांनी प्रवास करून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला येथे येण्यास मनाई असल्याचं सांगितंल.  


कोरोनापासून बचाव करण्यासाठी अशोक मुंबईत आपल्या घरी वाराणसीला निघाला खरा पण तिथे पोहोचल्यावर आपल्या कुटुंबियांकडूनच आपल्याला नाकारण्यात आल्याच अशोक सांगतो. कोरोनाने सध्या मनामनात एक भीती निर्माण केलीय. कोरोनाची लागण ही लगेच होते यामुळे प्रत्येकाच्या मनात याबद्दल भीती निर्माण झाली आहे.