नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगानं वाढत आहेत. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी काही राज्यांना पत्र लिहिलं आहे. शुक्रवारी 2 हजारहून अधिक रुग्ण आढळलेल्या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढू शकतो यासाठी अलर्ट केंद्राने दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली, तेलंगाणा आणि तमिलनाडू या राज्यांना पत्र लिहून केंद्राने कोरोनावर नियंत्रण कसे ठेवायचे याबाबत सांगितलं आहे. केंद्राने या राज्यांना सांगितले आहे की, गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या राज्यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.


दिल्लीमध्ये 5 ऑगस्ट रोजी 2202 कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. भारतात सगळ्यात जास्त रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळ राज्यात 12 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आहे. तिसऱ्या स्थानावर कर्नाटक आहे. तर चौथ्या स्थानावर तमिळनाडू आणि त्यापाठोपाठ पंजाब आहे. 


कोरोनाचे जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आणि त्यानंतर भारतात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यांनी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. सॅनिटायझर आणि मास्क वापरा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.