नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होतेय. नव्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. गुरुवारी देशभरात गेल्या तासांत २ लाख नवीन केसेस नोंदवल्या गेल्या. तर बुधवारी (14 एप्रिल) रोजी 1.85 नवीन केसेस नोंदवल्या गेल्या. 


24 तासात 199620 लोक संक्रमित 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात 1 लाख 99 हजार 620 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या काळात 1037 लोक मरण पावले. त्यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी संख्या 1 कोटी 40 लाख 70 हजार 300 पर्यंत गेली आहे आणि 1 लाख 73 हजार 152 लोकांचा मृत्यू झालाय. 


भारतात जवळपास 2 लाख केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. तर 10 दिवसांपूर्वी देशात दररोज 1 लाख लोकांची नोंद झाली होती. म्हणजेच अवघ्या दहा दिवसांत संक्रमणाचा रोजचा आकडा 1 लाख ते 2 लाखांपर्यंत पोहोचला आहे. याआधी अमेरिकेत, दररोज 1 लाख ते 2 लाख केसेसपर्यंत पोहोचण्यासाठी 21 दिवस लागले. 



अमेरिकेत, गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरला 1 लाख रुग्णांची नोंद झाली. ती 20 नोव्हेंबरला 2 लाखांवर गेली. Worldometers.info वेबसाइटनुसार 8 जानेवारी या एकाच दिवशी अमेरिकेत 3 लाख 9 हजार 35 केसेस नोंदवल्या गेल्या. 


महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळमध्ये दररोज केसेस वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.


रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या 


24 तासांत 185248  लोक संक्रमित
मंगळवारी (13 एप्रिल) 1.61 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या 24 तासात 1 लाख 85 हजार 248 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर या काळात 1025 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी संख्या 1 कोटी 38 लाख 70 हजार 731 वर गेली आहे आणि 1 लाख 72 हजार 114 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


या राज्यात कोरोना वेगात 


एका दिवसात देशात कोविड -19 संसर्गाच्या नवीन घटनांपैकी  80.8 टक्के रुग्ण 10 राज्यांमधील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळमध्ये दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचे ते म्हणाले.