Viral Video Cow Hug Day on Valentine Day 2023: 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023) म्हणून साजरा होत आहे. तर, दुसरीकडे याच दिवशी गायीला मिठी मारा (Cow Hug Day)असे आवाहन भारतीय प्राणी कल्याण मंडळातर्फे करण्यात आले होते. व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी हा दिवस Cow Hug Day म्हणून साजरा करण्यात आला. मात्र, ऐनवेळी गाईने गोंधळ घातला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कसला Cow Hug Day... असं म्हणत नेटकरी हा व्हिडिओ (Viral Video) पाहून खिल्ली उडवत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाश्चिमात्य देशात असेलेली व्हॅलेंटाईन डे ची क्रेज भारतातही पहायला मिळत आहे. भारतात मात्र व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतो. परिणामी व्हॅलेंटाईन डे दिवशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं पहायला मिळतात. अशातच 14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारा आणि Cow Hug Day साजरा करा  असे आवाहन भारतीय प्राणी कल्याण मंडळाने केले होते.  14 फेब्रुवारीला गाईला मिठी मारुन वैदिक परंपरेचं पालन करुया असं मंडळाच म्हणण होते. गाईला मिठी मारल्याने भावनिक संपन्नतेचा अनुभव घेता येईल असा दावाही मंडळाने केला होता.


अयशस्वी  Cow Hug Day


Cow Hug Day साजरा करायला गेलेल्यांची काय अवस्था झालेय ते या व्हायरल व्हिडिओत पहायला मिळत आहे. काही संस्कृती रक्षक Cow Hug Day साजरा करताना व्हिडिओत दिसत आहेत. आधी हे संस्कृती रक्षक गाईला चारा देतात. यानंतर गाईला हार घालतात. शांतपणे उभी असलेली गाय अचानक उधळते. उसळ्या मारत गाय यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. यामुळे एकच गोंधळ उडतो पळापळ सुरु होते. गाईपासून बचाव करण्याच्या नादात एक दोघे जण जवळच असलेल्या हौदात पडतात. यांचा पाठलाग करणारी गाय देखील या हौदात पडते. यानंतर गाईसह हौदात पडलेले सर्व जण बाहेर येतात आणि गाय देखील शांत होते. 


या व्हिडिओवर अजमेर अशी लोकेशन आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते समजू शकलेले नाही. तसेच हा व्हिडिओ Cow Hug Day साजरा करतानाचाच आहे का? हे देखील निश्चित नाही. मात्र, अयशस्वी  Cow Hug Day अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


 



Cow Hug Day साजरा करण्यामागचा उद्देश काय?


गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा  हिंदू संस्कृतीत गायीला विशेष महत्व आहे. गाईला माता मानले जाते. या गो माते प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे दिवस Cow Hug Day म्हणून साजरा करा असे आवाहन करण्यात आले होते. गाईचे प्रचंड फायदे आहेत. गाईला मिठी मारल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येईल तसेच आपल्याला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद मिळेल असा दावाही करण्यात आला होता.