मुंबई : नावात काय आहे? असं म्हटलं जातं. पण काही नावांमध्ये रंजक कथा दडलेल्या असतात. मुलांच नाव ठेवायचं झालं तर पत्रिका पाहिली जाते. पण कुणी राज्याचं नाव आपल्या मुलाला ठेवत असेल तर... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या प्राध्यापकांच नाव आहे मध्यप्रदेश सिंह. सध्या या कुटुंबियांची प्रचंड चर्चा आहे. त्याला कारण आहे त्यांची नावं. एवढंच नाही तर मध्यप्रदेश यांनी आपल्या तीन महिन्यांच्या मुलाचे नावे ही प्रदेश आणि राजधानीच्या नावावरून ठेवले आहे.
 
1991 मध्ये धार जिल्ह्यातील बाग प्राथमिक शाळेत नाव नोंदवण्यासाठी शासकीय दस्तावेजात नावाची सर्वातआधी नोंद झाली. मध्यप्रदेश सिंह हे आपलं नाव सांगताना सिंह यांना प्रचंड अभिमान वाटतो. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1985 मध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी झाला होता.


मध्यप्रदेश सिंह आणि त्यांची पत्नी यांचं लव्हमॅरेज झालं. दोघं एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. त्यांच्या पत्नीने सांगितले की, कॉलेजमध्ये जेव्हा पहिल्यांदा त्यांचं नाव ऐकलं तेव्हा सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं. पण नंतर जेव्हा आमची मैत्री वाढली तेव्हा नावाचं काही वाटलं नाही. आज आम्ही सुखाने संसार करत आहोत.


ही व्यक्ती झाबुआ या शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. याचं नाव आहे मध्यप्रदेश. मध्यप्रदेश सिंह यांना त्यांच्या वडिलांनी हे नाव दिलं. सरकारी अधिकाऱ्यांकडून रागे भरल्यानंतर त्यांनी हे नाव ठेवलं. 


त्यांनी अगोदरच ठरवलं होतं की, मुलगा झाला तर मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ हे नाव मुलाला ठेवायचं. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलाचं नाव 'भोपाळ सिंह' ठेवलं आहे. मध्यप्रदेश सिंह यांना आपल्या नावावरून अनेकदा गोंधळांना सामोरे जावं लागतं. याकरता ते आपलं आधारकार्ड कायम सोबतच ठेवतात.