Crime : थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरने प्रेयसीचे केले 35 तुकडे
Crime News : मुंबईहून दिल्लीत आणून प्रियकराने तरुणीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करून रोज रात्री मृतदेहाचे तुकडे जंगलात टाकून देयाचा...
Delhi Crime : देशाची राजधानी असलेली दिल्ली (Delhi) पुन्हा एका प्रकरणामुळे हादरून गेली. प्रियकराने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या प्रियसीला लग्नाच्या बहाण्याने मुंबईहून (Mumbai Crime) दिल्लीत आणले. प्रियसीने लग्नासाठी दबाव टाकल्यावर प्रियकराने तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून मृतदेह दिल्लीच्या विविध भागात फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली. घटनेच्या सुमारे पाच महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पीडित 26 वर्षीय श्रद्धा वॉकर (Shraddha Walker) ही मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. येथेच श्रद्धाची आफताब अमीनशी (Aftab Amin) भेट झाली. आफताब हा महाराष्ट्रातील पालघर येथे राहतो. लवकरच दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in relationship) राहू लागले. या संबंधाची माहिती घरच्यांना कळताच घरांची त्यांना विरोध दर्शविला. त्यानंतर आफताबने श्रद्धाला लग्नाच्या बहाण्याने मुंबईहून दिल्लीत आणले आणि तिची हत्या केली.
वाचा : पुढील 25 वर्षात भारत कसा असेल? 'या' चिमकुल्याने दाखवलं एका चित्रात
पोलिसांनी सांगितले की, 59 वर्षीय विकास मदन वॉकर यांनी 8 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मेहरौली पोलिस (Mehrauli Police) ठाण्यात आपल्या मुलीच्या अपहरणासाठी एफआयआर (FIR) दाखल केला होता. आफताब अमीन पूनावाला नावाच्या व्यक्तीनं कॉल सेंटरमध्ये (Call Center ) काम करणाऱ्या श्रद्धा वॉकरला लग्नाच्या बहाण्यानं मुंबईहून (Mumbai to Delhi) दिल्लीला आणलं. काही दिवसांनी श्रद्धानं त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. तेव्हा आफताबनं तिची हत्या करून तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्यानंतर दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
वाचा : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी!
हत्या झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) याला अटक केली. आफताबने सांगितले की, श्रद्धाने अनेकदा त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे 18 मे रोजी भांडण होऊन त्याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. यानंतर पोलिसांनी आफताबच्या जबानीवरून खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस पथक आरोपीच्या जबानीच्या आधारे मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
श्रद्धाचे वडिल विकास वॉकर यांनी सांगितलं की, "कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केल्यामुळे दोघांनीही मुंबई सोडून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की, ते दोघेही दिल्लीतील महरौलीमधील छतरपूर भागात राहतात. आमच्यापर्यंत मुलीची माहिती कुठून ना कुठून पोहोतच होती. पण, मे महिन्यापासून तिच्याबाबत आम्हाला काहीच माहिती मिळाली नाही. आम्ही तिला फोन करण्याचा प्रय्तन केला, पण तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आम्हाला शंका आली. त्यामुळे मी थेट दिल्लीत येऊन तिला भेटण्याचा निर्णय घेतला."
Delhi, Mumbai Crime, Crime News, MUMBAI