लखनऊ : भारतातील एका भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये एका सुनेने आपल्या सासऱ्यावरतीच बलातकाराचा आणि विनयभंगाचा आरोप लावला आहे. तिचा नवरा घरााबाहेर पडला की, तिचा सासरा तिच्यासोबत अश्लील कृत्य करत असल्याचे सुनेने सांगितले आहे. हे प्रकरण खरोखरच धक्कादाय आहे. आपल्याच मुलाच्या बायकोवर घाणेरडी नजर ठेवण्याचा किळसवाणा प्रकार एका बापाने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपीमधील पिलीभीतमधून उघडकीस आलेल्या या प्रकरणामध्ये एका नराधमाने सासरा आणि सून यांच्यातील नात्याला कलंक लावला आहे. मुलगा गेल्यावर सून घरात एकटी असल्याचा फायदा सासरा घेत असत. मुलाच्या लग्नानंतर सासऱ्याची सुनेवर घाणेरडी नजर ठेवत होती. सुनेचा आरोप आहे की, एके दिवशी तिचा नवरा निघून गेल्यावर सासऱ्याने तिला खोलीत बोलावून तिच्यावर बलात्कार केला.


त्यानंतर तिच्या सासऱ्यांनी तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. याबाबत तिने पतीला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही एक फायदा झाला नाही. उलट तिला मारण्याची धमकी देण्यात आली. नंतर महिलेने पोलिसात यासंदर्भात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. परंतु तेथे देखील कोणी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर याप्रकरणी पीडितेने एसपीकडे तक्रार दाकल केली आहे.


लखनऊ येथील या महिलेचा विवाह 18 एप्रिल 2018 रोजी बिसलपूरमधील एका गावातील तरुणाशी झाला होता. तिचा नवरा गवंडी म्हणून काम करतो असे तिने सांगितले. जेव्हा तो घराबाहेर कामासाठी पडायचा तेव्हा तिचा सासरा तिच्यावरती बलात्कार करायचा आणि हे एकदा दोनदा नाही तर अनेकवेळा घडले आहे, ज्यामुळे यासंदर्भात तिने एसपीकडे तक्रार नोंदवली.


सुरूवातीला पीडितेने बिसलपूर कोतवालीत जाऊन तक्रार दिली असता पोलिसांनी तपास आणि कारवाईच्या नावाखाली तिला कोतवालीच्या बाहेर फेकले. पीडितेची आई लखनऊहून बिसलपूर कोतवाली येथे येऊन न्यायाची याचना करत होती. रविवारीही पीडितेचे आई-वडील कोतवाली येथे पोहोचले आणि न्यायाची याचना केली. पीडितेने एसपींना तक्रार पत्र देऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.