नवी दिल्ली : जम्‍मू-काश्‍मीरच्या कुलगाम डीसी ऑफिसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले, सीआरपीएफचे ASI अशोक आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढा देत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री आर्मी बेस हॉस्पिटलचे ASI अशोक यांच्या डोक्याचं ऑपरेशन करण्यात आलं. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत. डीसी ऑफिसवर गुरूवारी झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. दहशतवादी हल्यानंतर त्यांच्या सहकारऱ्यांनी सांगितलं की, डीसी साहेब आम्हाला आधीच सांगितलं होतं, 'शत्रू आपल्यावर लक्ष ठेवून आहे, चौकस राहा, आपल्यावर कधीही हल्ला होवू शकतो'.


हल्ला होणार याची कुण कुण लागली होती...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदेश दिल्यानंतर एएसआय अशोक हे आपल्या टीमसोबत दुसऱ्या पोस्टला निघून गेले, आणि गुरूवारी त्यांना कुलगामला तैनात करण्यात आलं, जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेचं काम त्यांना देण्यात आलं होतं. आपल्या पोस्टवर पोहोचल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना ते सकाळपासून दिलेला संदेश पुन्हा पुन्हा सांगत होते. जिल्हा अधिकारी कार्यालयात दुपारपर्यंत असं काहीही झालं नाही, ज्यामुळे आमच्या मनात शंका येईल. पण एएसआय अशोक साहेबांची नजर सतत गेटमध्ये घुसणाऱ्या व्यक्तीवर लागून होती. आम्हाला सांगण्यात आलं की, अतिरेकी हत्यारं लपवून आत येऊ शकतात. पण दुपारपर्यंत असं काहीच घडलं नाही.


निष्पाप लोकांवर गोळीबार करायचा नव्हता


पण दुपारी सव्वाबारा वाजेला आम्हाला एक आवाज ऐकू आला, आमचं लक्ष एसएसआय अशोक कुमार यांच्याकडे गेलं, आणि एक व्यक्ती त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत होता. आम्ही सर्व एएसआय अशोक कुमार यांना वाचवण्यासाठी त्यांच्या दिशेने गेलो, पण त्या आधी खूप काही घडून गेलं होतं. आम्ही पाहिलं की, एसएसआय अशोक कुमार यांची बोटं AK-47 च्या ट्रिगरवर होती. पण डोळे डीसी ऑफिसमध्ये अडखळलेल्या लोकांवर होती. स्वत:चं जीवन धोक्यात असताना त्यांच्या डोक्यात हेच सुरू होतं की, गोळी चालवली तर ऑफिसमधील एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. काही सेकंदात त्यांनी निर्णय घेतला की, काहीही झालं तरी निष्षाप लोकांचं जीवन धोक्यात टाकणार नाही.


अतिरेक्याला AK-47 हिसकवायची होती...


या दरम्यान एका अतिरेक्याने आपली रायफल एएसआय अशोक यांच्याकडून जोर लावून खेचण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अंदाज आला की अतिरेक्याना आता रायफल हिसकवायची आहे. यासाठीच त्यांनी हा हल्ला केला आहे. तोपर्यंत एएसआय अशोक कुमार यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. पण ते अतिरेक्यावर आपली पकड आणखी मजबूत करत होते. अतिरेकी काहीही करून त्यांच्याकडून रायफल खेचण्यामागे होता. यानंतर अतिरेक्याची नजर आमच्यावर पडली आणि त्याला समजलं, जर एक सेकंदही आता येथे थांबलो तर, आता आपलीच सुटका होणार नाही. त्याने एएसआय अशोक कुमार यांना जोराचा धक्का दिला आणि तेथून पळ काढला.


हिमाचलचे रहिवासी आहेत, अशोक कुमार


सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ४६ वर्षांचे अशोक कुमार मूळचे हिमाचल प्रदेशचे हमीरपूरचे आहेत, ते दीड वर्षापासून काश्मीर खोऱ्यात तैनात आहेत. एएसआय अशोक कुमार आपल्या निर्भिड सेवेमुळे ओळखले जातात.