Video : पुन्हा चीनमध्ये जाणार का? दलाई लामा म्हणतात, `देशातील मोदी सरकार...`
Dalai lama : तिबेटमध्ये चिनी सैनिकांच्या वाढत्या हस्तक्षेपानंतर दलाई लामा यांनी भारताचा आश्रय घेतला आहे. तेव्हापासून चीनवर दलाई लामा हे सातत्याने ताशेरे ओढत आहेत. तवांग सेक्टरमधील संघर्षानंतरही त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Dalai lama : गलवान संघर्षानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये (Tawang sector) चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये जोरदार चकमक झाली. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. तर दुसरीकडे भारतीय सैनिकांपेक्षा चिनी सैनिक जास्त जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारतालाच माझी पहिली पसंती - दलाई लामा
सध्या याच मुद्द्यांवरुन दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत आता तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. चीनमध्ये परतण्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी याबाबत भाष्य केले. चीनमधील चिनी सैन्याने तिबेटी लोकांवर दबाव वाढवल्यानंतर दलाई लामा 1959 मध्ये भारतात आले होते. लामा भारतात पोहोचले आणि मॅक्लॉडगंज, धर्मशाला येथे राहू लागले. अरुणाचल प्रदेशातील तवांग हा देखील तिबेटचाच भाग असल्याचा चीनचा दावा आहे. त्यानंतर आता पुन्हा तुम्ही चीनला जाणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी भारतालाच माझी पहिली पसंती आहे, असे दलाई लामा यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा >> चीनला तवांगवर ताबा का मिळवायचा आहे?
भारतात पंतप्रधान मोदी यांचे सरकार आहे
"भारत सोडून चीनला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 'भारत' हे माझे कायमचे वास्तव्याचे ठिकाण आहे. भारत सोडून चीनमध्ये परतण्यात काही अर्थ नाही. मला चीनपेक्षा भारत जास्त आवडतो. हे 1992 नाही तर 2022 हे चीनने लक्षात ठेवायला हवं आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. ते कुणालाही सोडणार नाहीत. त्यांना भारत सरकार आणि भारतीय सेनेवर पूर्ण विश्वास आहे आणि ते तवांगचा भाग सुरक्षित ठेवतील," असे दलाई लामा यांनी म्हटले.
"1962 च्या युद्धात तवांगमधील भिक्षूंनी भारतीय सैन्याला मदत केली होती. चिनी सैन्यही मठात घुसले होते, असेही दलाई लामा यांनी म्हटले आहे. तवांग पूर्वी तिबेटचा भाग होता आणि चीन सरकारने तिबेटवर ताबा मिळवला होता.
यापूर्वीही ओढले ताशेरे
तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी यापूर्वीही चीनवर ताशेरे ओढले आहेत. मी भारताच्या खुल्या आकाशाली शेवटचा श्वास घेणे पसंद करेल, असे लामा यांनी म्हटले होते. युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीस (USIP) तर्फे धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात तरुणांना संबोधित करताना त्यांनी ही टीका केली होती.