मुंबई : मगरी किती धोकादायक असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. फक्त टिव्ही असो किंवा सोशल मीडिया आपल्याला बऱ्याचवेळा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ पाहून आपल्याला भीती वाटते थरकाप उडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये  एक व्यक्ती मगरीच्या अगदी जवळ जाऊन चक्क त्याच्यासोबत स्टंटबाजी करण्याचा प्रयत्नही करत आहे. परंतु त्याची ही स्टंटबाजी त्याचाच अंगाशी आलेली दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणखी वाचा : आमिर प्रमाणे आमचा चित्रपट पण बॉयकॉट करा; अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूनं केली विचित्र मागणी


या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ फिगेन नावाच्या तुर्की महिलेने शेअर केला आहे. फीगेनने हा 11 सेकंदाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडीओत एक मुलगा मगरीच्या तोंडात हात घालण्याचा स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात ती मगर त्या मुलाचा हात पकडते आणि पुढे जे अनपेक्षित होतं तेच घडलं. मगरीने मुलाचा हात पकडताच ती त्याचे संपूर्ण शरीर फिरवू लागते. तोही हात वाचवण्यासाठी मागे फिरतो, परंतु मगरीने त्याचा हात जबरदस्तीने पकडलेला दिसत आहे. 


आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर



आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ शेअर करत यावर मी काय बोलू हेच मला कळेना असे कॅप्शन त्या महिलेने दिले आहे. जवळून पाहिल्यास हात रक्ताने भीजल्याचे आणि वाकलेला दिसत आहे. व्हिडिओ आधीच 4 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहेहा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले.