मुंबई :  राज्यात कोरोनाचा स्फोट झालेला असताना आता आणखी एक हादरवणारी माहिती समोर आली आहे. जगामध्ये आता हायब्रिड कोरोना व्हायरसचा धोका वाढलाय. कोरोनाची लस या व्हायरसवर किती प्रभावी आहे, हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यात हा नविन व्हायरस किती खतरनाक आहे, हे शास्त्रज्ञांना उमगलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात सध्या नव्या हायब्रिड कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. दोन व्हायरसच्या संयोगातून हा हायब्रिड व्हायरस जन्माला आला आहे.


माणसातून माणसामध्ये हायब्रिड व्हायरसचं संक्रमण होत आहे. अमेरिकेतील एमोरी युनिवर्सिटीचे वैज्ञानिक डेव व्हॅनिंसगबर्ग यांनी या हायब्रीड व्हायरसची माहिती जगापुढे आणली आहे.


  • यूकेतील B.117 आणि कॅलिफोर्नियामधील B.1.429 या व्हायरसच्या संयोगातून हायब्रिड व्हायरस तयार झाला आहे.

  • सध्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये हा व्हायरस धुमाकूळ घालतोय. अँटिबॉडीजलाही प्रभावहीन बनवण्याची क्षमता नव्या व्हायरसमध्ये आहे.

  • वुहानमध्ये सापडलेल्या व्हायरसपेक्षा हायब्रिड व्हायरसचे स्पाइक प्रोटीन अधिक बळकट आहेत.

  • सध्याच्या कोरोना लसी नव्या व्हायरसवर किती प्रभावी आहेत, हे प्रश्नचिन्हच आहे.


केवळ अमेरिकाच नव्हे तर अनेक देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात देखील कोरोनाचा स्फोट झालाय. अशावेळी हायब्रिड कोरोना व्हायरस चिंतेत आणखी भर टाकणारा आहे.


त्यात हा व्हायरस आपल्या संरचनेत झपाट्यानं बदल करत असल्यानं लसनिर्मितीत देखील बदल करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण का होत असावी, याचं कारण हायब्रिड कोरोना तर नाही ना...? असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.