Dearness allowance Hike: अखेर आनंदाची बातमी आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 34% वाढ निश्चित
Dearness allowance : महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो.
मुंबई : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित मानली जात आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (Dearness allowance) मिळू शकतो. AICPI निर्देशांक, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे सन 2001 नुसार, डिसेंबर 2021 साठी निर्देशांकात एक अंकाची घट झाल्याने निर्देशांक 361 अंकांवर गेला आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो शकतो. (7th Pay Commission Latest News marathi)
मार्चनंतर जाहीर
सध्या 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी २०२२ पासून 3% अधिक महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. आता एकूण महागाई भत्ता 34% झाला आहे.
7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, मूळ वेतनावर महागाई भत्ता दिला जातो. लवकरच त्याची घोषणा केली जाईल. मार्चनंतर त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आणखी 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.