नवी दिल्ली : तामिळनाडूतील सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत माहिती देणार आहेत. तमिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत विमानात होते. सीडीएस बिपिन रावत पत्नी मधुलिका रावत यांच्यासह वेलिंग्टनमधील डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.



संसदेत माहिती दिल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे कुन्नूरसाठी रवाना होणार आहेत. दुसरीकडे वायुदलाचे प्रमुख घटनास्थळी रवाना झाले आहेत. सुलूर एअरबेस या ठिकाणी ते पोहोचणार आहेत.