Murder Case In Delhi: देशाची राजधानी दिल्लीतल्या (Delhi) जहांगीरपुरी (Jahangirpuri) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) म्हणण्यानुसार, आरोपी 'पुष्पा' (Pushpa) सारख्या गुन्ह्यांवर आधारित चित्रपटांनी प्रभावित होते आणि त्यांना गुन्हेगारीच्या जगात 'प्रसिद्ध' व्हायचं होतं


घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर करायचा होता पोस्ट
दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, तीन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही बनवला होता आणि तो त्यांना इन्स्टाग्रामवर टाकायचा होता.


चाकू केली व्यक्तीची हत्या
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जहांगीरपुरी पोलिसांना बुधवारी बाबू जगजीवन राम मेमोरियल हॉस्पिटलमधून फोन आला. एका व्यक्तीच्या पोटात चाकूने वार करण्यात आला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शिबू असं मृताचे नाव असून तो जहांगीरपुरीचा रहिवासी असल्याचं  पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं.


अल्पवयीन आरोपींवर गुंडांच्या जीवनशैलीचा प्रभाव
मयत आणि आरोपींमध्ये भांडण झालं. त्यानंतर अल्पवयीन आरोपींनी चाकूने वार करून त्याची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली.  पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते 'पुष्पा' आणि 'भौकाल' सारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दाखविलेल्या गुंडांच्या जीवनशैलीने प्रभावित होते.