दिल्ली निवडणूक : मोदींनी घेतलेल्या दोन सभांच्या ठिकाणी `हे` झालेत विजयी
दिल्ली विधानसभा २०२० च्या निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यांच `झाडू`ची कमाल पाहायला मिळाली.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा २०२० च्या निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यांच 'झाडू'ची कमाल पाहायला मिळाली. आम आदमी पार्टीने या निवडणुकीत ६२ जागा जिंकल्या तर भाजपने ८ जागांवर विजय मिळवला. मात्र, भाजपने ज्यांच्यासाठी मते मागितली त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा झाल्यात. त्यांनी घेतलेल्या मतदारसंघात भाजपला एका ठिकाणी यश मिळाले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मोदींचा करिष्मा फारसा दिसून आला नाही. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या विकासाला भरभरुन मते मिळालीत.
भाजपने अरविंद केजरीवाल यांना हरविण्यासाठी मोठी राजकीय फौज उभी केली होती. स्वत: मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तशी यंत्रणा उभी केली होती. मात्र, संपूर्ण ताकद पणाला लावलेल्या भाजपला देशाच्या राजधानीत केजरीवाल यांनी रोखून धरत मोठा विजय मिळवला. अरविंद केजरीवाल यांनी अत्यंत खुबीने आपली सर्व निवडणूक यंत्रणा हाताळली. तसेच भाजपकडून टाकला जाणारा प्रत्येक चेंडू न बोलताच त्यांच्याच कोर्टात पडू दिला. त्यामुळे भाजप विरुद्ध केजरीवाल असा प्रचार झाला नाही. भाजपने सातत्याने केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडण्याचे काम केले. तर केजरीवाल यांनी विकासाचा मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला. राष्ट्रीय प्रश्नाऐवजी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यामुळे भाजपची मोठी पंचायत झाली आणि त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला.
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजप उमेदवारांसाठी प्रचार केला होता. परंतु मोदींच्या सभेचा फायदा झाला नाही. त्यांच्या सभांचा प्रभाव पडलेला दिसून आला नाही. हेच निवडणूक निकालातून दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने दिल्लीतील ७० पैकी तब्बल ६२ जागांवर आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे. तर भाजपला अवघ्या ८ जागांवर आघाडी घेता आली आहे.
नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतलेल्या विश्वासनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. ओमप्रकाश शर्मा यांनी आप उमेदवाराच पराभव केला. मात्र मोदींची दुसरी सभा ज्या मतदारसंघात झाली त्या द्वारकामध्ये आपच्या उमेदवाराने बाजी मारत भाजपला शह दिला. आपचे विनय मिश्रा हे विजयी झालेत.