नवी दिल्लीः दिल्लीतील शहादरा भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. (Delhi Crime News) पत्नी आणि सहा वर्षांच्या लेकीची हत्या करुन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली मेट्रोतील सुपरवायझर पदावर कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षीय सुशीलने राहत्या घरातच पत्नी अनुराधा आणि ६ वर्षांची मुलगी आदितीची चाकू भोसकून हत्या केली आहे. पत्नी व मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर सुशीलने घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. आरोपीच्या घरातून पोलिसांनी एक चाकू ताब्यात घेतला आहे. तसंच, घरातील कॅम्पुटर ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली आहे. तपासणी करत असतानाच पोलिसांना असं काही आढळलं की या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला. सुशीलने पत्नी आणि मुलीची हत्या करण्याआधी how to hang असं गुगल सर्च केले होते. सुशीलने केलेल्या गुगल सर्चमुळं पोलिसही चक्रावले आहेत. 


सुशीलने आत्महत्येचं पाऊल का उचललं? याचा तपास पोलिस करत आहेत. आरोपीने १३ वर्षांच्या मुलालादेखील मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो थोडक्यात बचावला. दरम्यान सध्या मुलगा रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


स्वतःच दिली हत्येची कबुली


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास पीसीआरवर एक फोन आला होता. फोन करणारा व्यक्ती हा आरोपीचा मित्र होता. त्यांने दिलेल्या माहितीनुसार, सुशील मेट्रोमध्ये काम करतो. पण आज तो कामावर आला नाही. म्हणून मी त्याला फोन लावला. त्यावर तो रडत होता. त्यांने सांगितले की, मी घरातल्या सगळ्यांची ह्या केलीय आणि फोन कट केला. मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लगेचच माहिती काढली. 


हेसुद्धा वाचाः Beer Wine At Workplaces: आता ऑफिसमध्ये मिळणार Beer आणि Wine! राज्य सरकाने स्वीकारलं नवं धोरण


पोलिसांनी फोनची पडताळणी केल्यानंतर घटना खरी असल्याचे निदर्शनास आले. पोलिस घटनास्थळी पोहोचताच त्यांना तिथे तीन मृतदेह आढळले. आरोपीची पत्नी अनुराधा आणि मुलीच्या शरीरावर चाकुने वार केल्याच्या जखमा आढळल्या आहेत. सुशीलने दोघींवर चाकुने वार करत नंतर आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. त्याने त्याच्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने त्याला गंभीर इजा झाली नाही. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, सुशीलने इतकं टोकाचे पाऊल का उचलले? पत्नी आणि मुलीची हत्या का केली? असे अनेक प्रश्न दिल्ली पोलिसांसमोर आहेत. पोलिस या प्रकरणी कसून तपास करत आहेत.