Air India Urinarion Case : विमानात पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशावर लघुशंका केल्यानंतर एअर इंडिया ला आधीच दंड ठोठावण्यात आला असताना आता पुन्हा एकदा त्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) कारवाईला सामोरं जाव लागत आहे. एअऱ इंडियावर आठवड्याभरात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. एअर इंडियाने विमानातील प्रवाशाचं गैरवर्तवणुकीबद्दल माहिती न दिल्याने त्यांना 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी पॅरिस-नवी दिल्ली विमानात हा प्रकार घडला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीजीसीएच्या माहितीनुसार, या घटनेत एक प्रवासी शौचालयात धुम्रपान करताना आढळला होता. तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि विमानातील सदस्यांनी वारंवार सांगूनही नियमांचं पालन करत नव्हता. तर दुसरा एक प्रवासी रिकाम्या सीटवर आराम करत बसला होता. तसंच तिथे महिला आपल्या सीटवर नसता तिचं ब्लँकेट ओढून घेतलं होतं. 


5 जानेवारीला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीजीसीएने एअर इंडियाच्या अकाऊंटेबल मॅनेजरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नियमांचं पालन न केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा त्यांनी केली आहे. एअर इंडियाने 23 जानेवारीला आपलं उत्तर सादर केलं. 


उत्तर दाखल झाल्यानंतर डीजीसीएने घटनेची माहिती न दिल्याबद्दल तसंच प्रकरण त्यांच्या अंतर्गत समितीकडे पाठवण्यास उशीर केल्याबद्दल दंड ठोठावला आहे.


एअर इंडियाला सु-सू कांड प्रकरणी आधीच ठोठावण्यात आला आहे दंड


मद्यधुंद प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला (Air India Slapped with 30 Lakh Fine) आला असून तीन महिन्यांसाठी पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासह कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सेवेवरही तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


नेमकं काय झालं होतं?


शंकर मिश्रा याने 26 नोव्हेंबरला न्यूयॉर्क-दिल्ली विमानात मद्यधुंद अवस्थेत महिलेवर लघुशंका केली होती. 27 नोव्हेंबरला महिलेने एअर इंडिया ग्रुपच्या चेअरमनला पत्र लिहून सगळा प्रकार सांगितला. ४ जानेवारीला एअर इंडियाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंनी आपापसात चर्चा करुन वाद मिटवला असल्याचं वाटल्याने आपण इतके दिवस पोलिसांकडे गेलो नव्हतो असा दावा एअर इंडियाने केला. तक्रार दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्राला अटक केली.