नवी दिल्ली : यूपीए सरकारच्या कार्यकाळात घडलेल्या कथीत १००० कोटी रूपयांच्या एविएशन घोटाळ्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग याचे नाव आले आहे. इनकम टॅक्स विभागाने केलेल्या चौकशीत हा घोटाळा उघडकीस आल्याचे वृत्त आहे. एविएशन फिक्सर दीपक तलवारने दिग्विजय सिंग आणि त्यांच्या परिवारासाठी विमानाची तिकीटे बुक केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटी डिपार्टमेंटकडून करण्यात आलेल्या चौकशीत दीपक तलवार यांच्या वेव हॉस्पिटॅलीटी एमिरेट्स फर्मकडून दिग्विजय आणि त्यांच्या परिवारासाठी १.२५ कोटी रूपयांची तिकीटे खरेदी केली होती. ज्यात ६० लाख की तिकीटे दिग्विजय आणि त्यांच्या पत्नीसाठी खरेदी केली होती. ही तिकीटे तेव्हा खरेदी केली होती, जेव्हा कॉंग्रेस सत्तेत होती आणि दिग्विजय सिंह कॉंग्रेसचे महासचिव होते.


आयकर विभाग तलवारकडे १००० कोटी रूपयांच्या बहिशेबी संपत्तीसंबंधी चौकशी करत आहे. दीपक तलवार याला कॉर्पोरेटर लॉबिस्ट आणि अनेक राजकीय नेत्यांच्या जवळचा व्यक्ती म्हणून ओळखले जाते.


दरम्यान, दिग्विजय सिंग यांनी याबाब म्हटले आहे की, त्यांची पत्नी आशा आणि मुलीचा ह्युस्टनमध्ये कॅन्सरवर उपचार सुरू होता. ह्यूस्टनसाठी त्यांनी सर्व तिकीटे स्वत: खरेदी केली होती. दीपक तलवारच्या फर्मने तिकटे अपग्रेड केली होती.