DLF Mall Bomb Threat : सुट्टीच्या दिवशी अनेकांचेच पाय मॉल किंवा शॉपिंग सेंटरकडे वळतात. त्यामुळं या दिवसांमध्ये अशा ठिकाणांवर प्रचंड गर्दी असते. अशाय गर्दीमध्ये एखादी अफवा नेमकी किती गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण करू शकते याची प्रचिती नुकतीच दिल्लीती नोएडा इथं आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी नोएडा येथील प्रसिद्ध डीएलएफ मॉलमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानकच तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मॉलमध्ये बॉम्ब असल्याची अफवा वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. प्राथमिक माहितीनुसार एका अज्ञात फोनवरून बॉम्ब असण्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर लगेचच मॉलमध्ये नोएडा पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झालं. 


सूत्रांच्या माहितीनुसार नोएडा पोलिस अधिकारी आणि पोलीस पथकानं घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीनं मॉल रिकामा करण्याच्या सूचना दिल्या. मॉलमध्ये येऊन पोलिसांनीच Movie, जेवण आहे तसंच सोडून पळा… अशा सूचना केल्यामुळं नागरिकांनीही तिथून बाहेर पडण्यासाठी घाई केली. 


सदरप्रकरणी पुढं पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकानं मॉलची पाहणी आणि तपासणी केली. श्वानपथकाच्या सहाय्यानं मॉलमध्ये बॉम्बचा शोध घेण्यात आला. काहींनी खरेदी अर्ध्यावर सोडली, तर काही खाणाऱ्या ग्राहकांचा घास हाताततच राहिला. काहींनी चित्रपट सुरु असताना सूचना मिळताच अर्थ्यावरच तिथून निघायची घाई केली. नागरिकांमध्ये हे भीतीचं वातावरण पाहता त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया म्हणे मॉक ड्रिलचा भाग होती असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. 


हेसुद्धा वाचा : ‘आईचे क्रेडिट कार्ड घे आणि...’, 12 वर्षांच्या मुलाला जुगार खेळायला शिकवतोय इन्फ्लुएन्सर, VIDEO पाहून संताप


 


मॉक ड्रील किंवा अशा घटनांविषयी नागरिकांना सत्रक करणं आवश्यक असलं तरीही ही पद्धत मुळीच योग्य नसल्याचं म्हणत तिथं आलेल्या अनेकांनीच नाराजीचा तीव्र सूर आळवला. दरम्यान, मॉलमध्ये बॉम्ब नसून, हा एका प्रात्यक्षिकाचा भाग होता, ही मॉक ड्रील होती यासंदर्भातील वृत्ताला एसीपी आणि पीआय यांनीही दुजोरा दिल्याचं म्हटलं जात आहे.