‘आईचे क्रेडिट कार्ड घे आणि...’, 12 वर्षांच्या मुलाला जुगार खेळायला शिकवतोय इन्फ्लुएन्सर, VIDEO पाहून संताप

सोशल मीडियावर एका व्यक्तीने ऑनलाइन सट्टा खेळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या एका  इन्फ्लुएन्सरचा वीडियो शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून पालकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

शिवराज यादव | Updated: Aug 17, 2024, 12:54 PM IST
‘आईचे क्रेडिट कार्ड घे आणि...’, 12 वर्षांच्या मुलाला जुगार खेळायला शिकवतोय इन्फ्लुएन्सर, VIDEO पाहून संताप  title=

सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाचा वापर प्रत्येक गोष्टीसाठी केला जात आहे. काहीजण याचा वापर जनजागृतीसाठी तर काही जण मनोरंजन करत त्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी करतात. पण यातील काही कंटेंट घरातील लहान मुलांच्या हाती न लागण याकडे लक्ष द्याव लागते. अन्यथा त्याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल अशी भीती असते. याचाच प्रत्यय देणारा एक वीडियो एका व्यक्तीने शेअर केला आहे. हा वीडियो शेअर करत त्यांनी इन्फ्लुएन्सरवर संताप व्यक्त केला आहे.

इन्स्टाग्राम यूज़र हर्ज गाहले यांनी एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये एक इन्फ्लुएन्सर चक्क एका 12 वर्षांच्या मुलाला आईचे क्रेडिट कार्ड चोरण्याचा सल्ला देत त्या पैशातून जुगार खेळण्यास सांगत आहे. व्हिडिओत हा इन्फ्लुएन्सर कमेंट वाचतो ज्यामध्ये लिहिण्यात आलेलं असते की, ‘मी 12 वर्षांचा असून  Online Gambling शिकू इच्छित आहे. पण हे कसे करायचे हे मला माहीत नाही’. त्यावर इन्फ्लुएन्सर उत्तर देतो की, ‘तू 12 वर्ष आधी हे सुरु करायला हवे होतेस, आता एक काम करा आपल्या आईचे क्रेडिट कार्ड घे आणि 250 डॉलर्स लोड कर’.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Harj Gahley (@harjgahley)

हा वीडियो शेअर करताना हर्ज गाहले सांगतात की, पाहा तुमच्या मुलांवर किती भयानक प्रभाव पडू शकतो. अशा कंटेंटपासून सावध रहा. असे इन्फ्लुएन्सर तुमच्या मुलांना चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडू शकतात.

हा व्हिडिओ 3.6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि सुमारे 4,500 लाईक्स मिळाले आहेत. यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, 'या मूर्खपणाबद्दल या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.' तथापि, काही लोकांचे म्हणणे आहे की तो फक्त उपहासात्मकपणे हे म्हणत असून फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. यावर गहले म्हणाले, 'असं असलं तरी लहान मुलांना हे समजेल का, त्यांच्यावर प्रभाव पडेल.'

अनेकांनी यामध्ये पालकांनाही दोषी धरले आहे. आपली मुले इंटरनेट वापरताना नेमकी काय करतात याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचं असल्याचं ते म्हणत आहेत. तर काहींनी यासाठी काही नियम लागू करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

ही क्लिप शेअर करणाऱ्या हर्ज गेहले यांचे 4378 फॉलोअर्स आहेत. तो गैंबलिंग सपोर्ट प्रोजेक्टचे एमडी आहेत. ही एक संस्था आहे जी जुगाराशी संबंधित  समस्या असलेल्या लोकांना सहाय्य प्रदान करते.