मुंबई : तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँकेच्या नियमानुसार या बँकेच्या ग्राहकांना पैसे काढण्यावर बंधनं आली आहेत. बँकेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे आरबीआयने 2 बँकांवर कारवाई केली आहे. अलीकडच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँक विशेषत: सहकारी बँकांबाबत कठोर झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील दोन सहकारी बँकांवर आरबीआयने कारवाई केली आहे. सेंट्रल बँकेने उत्तर प्रदेशातील लखनऊ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि सीतापूरच्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर कडक कारवाई केली आहे.


या दोन्ही बँकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. त्यामुळे या बँकेतील ग्राहकांना पैसे काढण्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे या बँकेचे ग्राहक असणाऱ्यांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. 


दोन्ही सहकारी बँकांवरील हे निर्बंध पुढील सहा महिने असणार आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर, निर्बंध हटवायचे की शिथिल करायचे याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेईल. लखनऊ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहक यापुढे 30,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. 


दुसरी बँक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ​​ग्राहकांना 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे ग्राहकांना पुढचे 6 महिने मनस्ताप सहन करावा लागू शकतो.