Dog Attack On retired IAS : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील 14 वर्षांच्या मुलाचा कुत्रा चावल्याने (Dog Attack) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दीड महिन्यापूर्वी लहान मुलाला कुत्रा चावला होता. त्यानंतर त्याने आई-वडिलांपासून ही गोष्ट लपवून ठेवली. त्यानंतर रेबिजची (Rabies) लागण झाल्याने चिमुकल्याला जीव गमवावा लागला होता. अशातच आता आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला (Dog attack on retired IAS) कुत्र्याने चाव घेतल्याची घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील (UP News) नोएडा येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत आहे. नोएडाच्या पॉश सोसायटीमध्ये पुन्हा एकदा कुत्रा चावल्याची घटना समोर आलीये. सोसायटीतील एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्यावर कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये निवृत्त आयएएस अधिकारी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


नेमकं काय झालं?


सुबोध मेहता हे सेवानिवृत्त अधिकारी नॉलेज पार्क परिसरात राहतात. जेपी अमन सोसायटीच्या टॉवर एन 14 मध्ये त्यांच घर आहे. सेवानिवृत्त असल्याने त्यांनी तब्येतीवर कंट्रोल रहावा यासाठी मॉर्निंग वॉक सुरू केला.  गुरुवारी सकाळी सुबोध मेहता मॉर्निंग वॉकसाठी त्यांच्या टॉवरच्या लिफ्टजवळ पोहोचले, त्यावेळी पहाटेचे साडेपाच वाजले होते. त्यावेळी जे काही झालं ते सीसीटीव्ही (CCTV Video) कैद झालं आहे.


आणखी वाचा - कुत्रा चावल्यानंतर त्रास कमी करण्यासाठी '3' नैसर्गिक उपाय ठरणार फायदेशीर


पहाटेच्या साडेपाच वाजता गॅलरीत भटकी कुत्री फिरत होती. त्यानंतर एका भटक्या कुत्र्याने सुबोधवर हल्ला केला आणि त्याच्या मांडीला चावा घेतला. त्यानंतर त्यांनी थेट दवाखाना गाठला अन् उपचार घेतले. याआधीही सोसायटीमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत आम्ही अनेकवेळा प्राधिकरणाकडे तक्रार केली, मात्र कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.