हिस्सार : जपानी तंत्रज्ञान वापरून दत्तक घेतलेल्या गावातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर आपण भर देणार असल्याचं राज्यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी म्हटलं आहे. पुढील काही दिवसात जपानचं तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांचं उत्प्पन वाढवण्यावर उपाय योजण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणातील हिस्सारमध्ये आपल्या घरी सेक्टर 14 मध्ये पत्रकारांशी बोलताना, 5 गावांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती डॉ. सुभाष चंद्रा यांनी दिली.


या पाचही गावांचा विकास करण्यासाठी सदैव ते तप्तर असतात. काही दिवसांपूर्वी जपानमधून काही लोक याचा आढावा घेण्यासाठी आले होते. 3 दिवस त्यांनी या परिसराचा अभ्यास केला. तेथील तंत्रज्ञानावर बोलताना डॉ.सुभाष चंद्रा म्हणाले, 3 महिन्यात एक पिक घेतलं जावू शकतं. 


एलईडी बल्बशी संबंधित तंत्रज्ञानाने ते आपलं पिक उगवण्याची वेळ अर्ध्यावर आणून ठेवतात. हे तंत्रज्ञान या गावांमध्ये आणून शेतकऱ्यांना त्यांचा फायदा व्हावा, असं मला वाटतं असं या प्रसंगी डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितलं.


या गावांचा एकात्मिक विकास झाला पाहिजे. यासाठी आम्ही मॉडेल तयार केलं आहे. आम्ही फक्त हरियाणाच्याच नाही तर देशातील इतर गावांनीही हे तंत्रज्ञान आत्मसाथ करावं म्हणून प्रयत्न करीत आहोत, इतर राज्यातील लोकांनी देखील हे तंत्रज्ञान पाहून अभ्यास करून निवडावं असं आम्हाला वाटतं, असं डॉ.सुभाष चंद्रा म्हणाले.


डॉ. सुभाष चंद्रा यांनी हरियाणातील हिस्सारमधील 5 गावांचा विकास आणि आदर्श गावं बनवण्यासाठी दत्तक घेतली आहेत. यात सदलपुर, आदमपुर, खारा बरवाला, किशनगढ, मंडी आदमपुर या गावांचा समावेश आहे.


आतापर्यंत 350 कोटी रूपयांच्या विकास योजना


राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी म्हटलं आहे की, सुभाष चंद्रा फाऊंडेशनच्या प्रयत्नांनी या गावांचा सर्वांगीण विकास केला जात आहे. महिला सशक्तीकरण, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे, स्वच्छता अभियान प्रमाणे निरोगी राहण्यासाठी पावलं उचलली जात आहेत.


पिण्याच्या पाण्याची अडचण या गावांमध्ये सोडवण्यात यश आलं आहे, यासोबत वीज, पाणी, सीवरेज, रोज, रेल्वे ओव्हर ब्रीज सारखी कामं करण्यात आली आहेत, आतापर्यंत या कामांसाठी 350 कोटी रूपये खर्च झाले आहेत.


पुढील लक्ष्य साधण्यासाठी पाच गावातील युवकांचा क्लब बनवण्यात येणार आहे, यात 300 पेक्षा जास्त युवक जोडले जाणार आहेत. अशाच युवकांच्या प्रगतीसाठी एफपीओ बनवला जाणार आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. 


या वर्षी यात एक हजार शेतकरी जोडण्याचा प्रयत्न आहे. यामुळे याच नाही तर आणखी सर्व शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे. यासोबत जवळजवळ 1 हजार युवक आणि 500 महिलांना जोडण्यात येणार आहे, त्या दिशेने हे कार्य सुरू असल्याचं डॉ.सुभाष चंद्रा यांनी सांगितलं.


सोशल मीडियावरील वाईट आणि दिशाभूल करणाऱ्या मेसेजेसवर बोलताना राज्यसभा खासदार डॉ. चंद्रा म्हणाले....


डॉ.सुभाष चंद्रा यांनी सांगितलं, हा प्रचार हरियाणातील पानीपतमधून सुरू झाला होता, त्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. मी एकटा या व्यवसायात आहे, मी एक जाहीर पत्र लिहिलं, आणि असं जाहीर पत्र लिहिण्याची हिंमत कुणातच नाही, तर विचार करा, असा माणूस पळ कशाला काढेल. प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं यावेळी डॉ.सुभाष चंद्रा यांनी सांगितलं.