CIBIL Score Range: आपल्या काही चुकांमुळे सिबिल स्कोअर खराब होता. त्यामुळे भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करत असल्यास तुम्हाला कधीतरी कर्जाची गरज भासू शकते. पण सिबिल स्कोअर चांगला असल्यास बँकेकडून कर्ज मिळू शकते. कारण बँक कर्ज देण्यापूर्वी CIBIL स्कोअर तपासते. जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर कर्ज नाकारले जाते. त्यामुळे गरजेवेळी कर्ज न मिळल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर तो तुम्ही व्यवस्थित करू शकता. यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला तर जाणून घेऊयात..


CIBIL Score अशा पद्धतीने व्यवस्थित कराल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- जर तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर व्यवस्थित ठेवायचा असेल, तर कायम लक्षात ठेवा की कर्जाची वेळेवर भरपाई कराल. ईएमआय भरण्यास उशीर करू नका.


- तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासावा. अनेकदा कर्ज भरूनही बंद झालेलं दिसत नाही त्यामुळे कर्ज सक्रिय दिसते. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट रिपोर्ट तपासा.


- तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर सुधारायचा असल्यास, प्रत्येक वेळी तुमचे क्रेडिट बिल वेळेवर भरा. स्वत:वर कोणतेही कर्ज थकीत ठेवू नका. यामुळे तुमचा CIBIL स्कोर सुधारेल.


- तुमचा CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोणी लोन घेत असेल तर गॅरेंटर बनू नका. तसेच जॉईंट खातेही उघडू नका. कारण दुसऱ्याने चूक केली तर त्याचा परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर दिसून येतो.


बातमी वाचा- बँक चेकबुकवरील IFSC आणि MICR Code मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या


-तुम्हाला CIBIL स्कोअर चांगला ठेवायचा असल्यास एकावेळी अनेक कर्ज घेऊ नका. तुम्ही अनेक कर्ज घेतल्यास, त्यांची परतफेड करण्यास विलंब होऊ शकतो. अशा स्थितीत CIBIL स्कोअर खराब होण्याची शक्यता आहे.


- तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर सुधारायचा असेल, तर तुम्ही जेव्हाही कर्ज घ्याल तेव्हा दीर्घ कालावधीसाठी घ्या. यामुळे EMI ची रक्कम कमी होते आणि तुम्ही ती सहजपणे भरू शकता. जेव्हा तुम्ही वेळेवर पेमेंट करता, तेव्हा CIBIL स्कोर आपोआप वाढतो.