नवी दिल्ली : बलात्कारी डेरा बाबामुळे देशातील सार्वजनीक मालमत्ता आणि संस्थांना चांगलाच फटका बसला आहे. डेरा बाबा गुरमीत राम रहिम याच्या अंध भक्तांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे भारतीय रेल्वेला मोठा फटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेरा बाबा गुरमीत राम रहिम याला न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्यानंतर या बाबांच्या अनुयायांनी जोरदार धिंगाणा घातला. या भक्तांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. याचा परिणाम अनेक ट्रेन रद्द करण्यात झाला. तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणी ट्रेन बंद कराव्या लागल्या. त्यामुळे रेल्वेला चक्क ३३ कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. डेरा बाबाला सोमवारी (२८ ऑगस्ट) शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, अनुचित प्रकार टाळण्यासाठी २५ ऑगस्ट पासूनच काही ठिकाणी रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार, या तीन दिवसांमध्ये तब्बल ६९४ ट्रेनला फटका बसला. ज्यामुळे भारतीय रेल्वेला प्रतिदिन १० ते ११ कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. 


रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे तेव्हाच सुरूळीत होईल जेव्हा पंजाब आणि हरियाणा सरकार रेल्वेच्या सुरक्षेची हमी देईन. रेल्वेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत तब्बल ६९४ ट्रेन रद्द कराव्या लागल्या. ज्यामुळे रेल्वेला ३३ कोटी रूपयांचा फटका बसला.