मुंबई : लग्नसोहळा म्हटलं की जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या दिवसाच्या आठवणी कायम स्मरणात रहाव्यात यासाठीच अनेकांचा अट्टहास असतो. पण, कित्येकदा कामाचा व्याप, नोकरीच्या ठिकाणी न मिळणाऱ्या सुट्टा किंवा मग सुट्ट्यांची कमतरता या साऱ्यामध्ये मनात असणारे अनेक बेत मागे ठेवावे लागतात. पण, या पपिस्थितीवर सुवर्णमध्य साधत सरकारी सेवेतील एका जोडप्याने समाजापुढे आदर्श प्रस्थापित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकरारी सेवेत असणाऱ्या आणि २०१८च्या बिहार कॅड्रे तुकडीतून उत्तीर्ण झालेल्या IAS तुषार सिंग्ला आणि IPS नवजोत सिमी यांनी सिंग्ला यांच्या ऑफिसमध्ये  (कार्यालय) लग्नगाठ एकमेकांना आयुष्यभरासाठी साथ देण्याची वचनं दिली. मुळचे गुजराते असणआरे सिंग्ला आणि सिमी गेल्या काही काळापासून एकमेकांच्या संपर्कात होते. या विवाहसोहळ्यासाठी सिमी यांनी पाटण्यापासून बंगालपर्यंतचा प्रवास केला. 


सिंग्ला आणि सिमी यांनी कायदेशीररित्या एकमेकांचा पती- पत्नी म्हणून स्वीकार केला. या प्रक्रियेमध्ये त्यांनी फक्त विवाहकायद्यानुसार प्रतिज्ञा घेत आवश्यक त्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली. त्यामुळे कार्यालयात विवाह करण्याविषयी काहीसा नकारात्मक सूर आळवणाऱ्यांना खुद्द राज्यमंत्री अनुप रॉय यांनी थेट शब्दांत उत्तर दिलं. 


छाया सौजन्य- सोशल मीडिया 


'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार सिंग्ला यांनी लग्नासाठी पंजाबला जाण्याचा प्रयत्न केला होता. पण, कामाचा ताण जास्त असल्यामुळे वारंवार त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली जात होती. त्यामुळे अखेर सिंग्ला यांच्या कार्यालयातच हा छोटेखानी सोहळा पार पडला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या दोघांनीही एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. राज्यातील विधानसभा निवडणुकांचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका स्वागतसोहळ्याचं आयोजन करणार असल्याचंही सांगितलं. 


पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 



खासगी आणि कामाच्या ठिकाणी असणाऱं आयुष्य हे कायम वेगळं ठेवण्याचा अनेकांचा मानस असतो. पण, जबाबदाऱ्या आणि अपेक्षा वाढल्यानंतर मात्र यामध्ये समतोल राखला जाणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे कर्तव्यनिष्ठतेला प्राधान्य देत खासगी आयुष्याकडेही दुर्लक्ष न करणाऱ्या या जोडीची प्रशंसा सध्या सर्व स्तरांतून केली जात आहे.