Husband-Wife Beaten By Villagers In Suspect On Black Magic: भारताने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मात्र अजूनही देशात अंधश्रद्धा आणि जादूटोणा यांवर अधिक विश्वास ठेवत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली असलेली लोक अजूनही डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यास तयार नसतात. तर, काही ठिकाणी फक्त जादूटोण्याच्या संशयातूनही गुन्हे घडतात. तेलंगणातही एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, तंत्र-मंत्र आणि काळी जादू करण्याच्या संशयातून गावकऱ्यांनी एखा जोडप्यासोबत अमानुष कृत्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी एका जोडप्याला झाडाला लटकवून त्यांना बेदम मारहाण केली. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचली व हा सगळा प्रकार थांबवला आहे. तेलंगणातील कोलकुरु गावात हा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातच राहणाऱ्या यादैया आणि श्यामला या जोडप्याला गावातीलच काही स्थानिकांनी बेदम मारहाण केली. दोघेही काळीजादू व तंत्र मंत्र करतात असा संशय त्यांना होता. यादैया आणि श्यामला यांना बेदम मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या हात व पाय चेनने बांधून ठेवले व त्यांना झाडावर लटकवले. 


पती-पत्नीं दोघंही आक्रोश करत होतो मात्र गावकऱ्यांनी त्यांच्यावर थोडीदेखील दया न दाखवता त्यांना मारहाण करत होते. कोणीच त्याना वाचवण्यासाठी व त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले नाही. याउलट लोक त्यांचा व्हिडिओ बनवून व्हायरल करत होते. पोलिसांकडे हा व्हिडिओ पोहोचताच त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरु केला. या घटनेत सामील असलेल्या गावकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. स्थानिकांनी दोघे पती-पत्नी जादूटोणा व काळी जादू करत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला. त्यानंतर गावकऱ्यांच्या एका समुहाने त्यांच्या घरात घुसून हल्ला केला. गावातील एका ठिकाणी त्यांना खेचत घेऊन आले व तिथे त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना झाडाला बांधून ठेवले. 


गावातील लोकांचा आरोप काय?


स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जोडप्यांना गावकऱ्यांपासून वाचवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित गंभीर जखमी झाले नाहीयेत. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, गावकऱ्यांच्या आरोपांनुसार, यादैया छोट्या छोट्या गोष्टींवरुन सर्वांची वाद घालायचा आणि प्रत्येकवेळी जादूटोणा करण्याची भीती घालायचा. तसंच, काळी जादू करुन लोकांचा जीव घेईन, अशी धमकीही द्यायचा.