EPFO Recruitment 2019 : सहायक पदासाठी इथे करा अर्ज
EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी कार्यालयात काम करण्याची मोठी संधी चालून आली आहे.
नवी दिल्ली : EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी कार्यालयात काम करण्याची मोठी संधी चालून आली आहे. ईपीएफओने एकूण 280 सहायक पद भरण्यासाठी नोटीफिकेशन जारी केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 25 जून ही अंतिम तारीख आहे. ईपीएफओमध्ये सहायक पदाच्या भरतीसाठी www.epfindia.gov.in या वेबसाईटवर अधिक माहीती मिळू शकेल. भविष्य निधी कार्यालयात सहायक बनवण्यासाठी वयोमर्यादा ही 20 वर्षे ते 27 वर्षे इतकी आहे. तसेच सरकारी कर्मचारी, भविष्य निधी संघटनचे कर्मचारी आणि आरक्षित वर्गात येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
पात्रता आणि वेतन
ईपीएफओमध्ये सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विश्वविद्यालयाची पदवी असणे गरजेचे आहे.
सहायक पदासाठी निवडलेल्या उमेदवारास सातव्या वेतन आयोगाच्या शिफारीसीनुसार वेतन दिले जाईल. सध्या या पदासाठी 44 हजार 900 रुपये प्रतिमाह वेतन निर्धारित केले आहे.
अर्ज शुल्क
कर्मचारी भविष्य निधी संघटनमध्ये सहायक पदासाठी अर्ज करताना अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे. सामान्य वर्गाच्या उमेदवारास हे शुल्क पाचशे रुपये तर आरक्षित वर्गातील उमेदवारास 250 रुपये शुल्क भरावे लागले. अर्ज शुल्क हे ऑनलाईन भरावे लागेल. सहायक पदाच्या अधिक माहितीसाठी कर्मचारी निधीच्या लिंकवरून पीडीएफ फाईल देखील डाऊनलोड करता येऊ शकेल.