Fake Donation to Gurudwara:आपल्याकडे, देवाला भरभरून दान देणारी बरीच मंडळी आहेत. भारतात अशी अनेक देवस्थान आहेत जिथे भक्तांनी केलेल्या दानाची किंमत ही कोट्यवधींच्या घरात असते. तिरुपती बालाजी ,शिर्डी साईबाबा मंदिर ,लालबागचा राजा(tirupati balaji,shirdi saibaba,lalbagcha raja ) अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे कोट्यवधींचं दान भक्तांकडून(donation to temple) केलं जात.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या भक्तिभावाने काही भक्तमंडळी दान करत असतात पण काही अशी माणसं सुद्धा आहेत जी चक्क देवाला फसवायलासुद्धा मागेपुढे पाहत नाहीत . याचाच प्रत्यय येणारी एक घटना बिहारमध्ये घडली आहे .(fake donation to gurudwara in bihar)सध्या सगळीकडे याच प्रकारची जोरदार चर्चा होते आहे. 


आणखी वाचा:viral Video स्कुटीतून निघाला king Cobra..तुमच्यासोबतही घडू शकतो हा प्रकार..


एका कथित दानशूर डॉक्टरने ज्याचं नाव मिस्टर सामरा असल्याचं सांगितलं जात आहे. गुरुद्वारामध्ये(gurudwara) जवळपास पाच कोटी किमतीचे दागिने,महागड्या वस्तू,रत्न दान म्हणून दिले. मात्र त्याने केलेलं दान आता वादाच कारण ठरू लागलं आहे. कारण या डॉक्टरने दान म्हणून केलेले दागिने


आणखी वाचा:सप्तशृंगी देवीचं 1000 वर्षांपूर्वीचे मनमोहक रुप आलं समोर..1500 किलो शेंदूर काढला आणि ..पाहा Video


खोटे असून शुद्ध सोन्याचे नाही तर चक्क सोन्याने पोलिश केलेलं असल्याचं आढळून आलं आहे.नवीन वर्षाच्या सुरवातीला डॉक्टर सामरा यांनी गुरुद्वारामध्ये सोन्याचे दागिने, सोन्याचे हार,पलंग,आणि सोन्याने मढवलेली कलगी या सर्व वस्तू दान केल्या होत्या ..मात्र संशय आल्याने


गुरुद्वारा कमिटीने चौकशी केली आणि धक्कदायक प्रकार समोर आला . 


फसवणुकीप्रकरणी दिली आगळीवेगळी शिक्षा


तख्त श्री हरमंदिर जी पाटना साहिब गुरुद्वाराच्या (Takhat Sri Harimandir Ji Patna Sahib)प्रतिष्ठेला धक्का पोह्चवल्याच्या कारणावरून या व्यक्तीला शिक्षा करण्यात आली आहे . 


आणखी वाचा:viral :भरधाव येणाऱ्या बाईकने मुलीला ...; अपघाताचा थरार पाहून उडेल थरकाप


संबंधित व्यक्तीने फसवणूक केल्यामुळे गुरुद्वारा समिती खूप संतापली असून या व्यक्तीला पंचांच्या समोर शिक्षा ठोठावण्यात आली आहे , तीन दिवस  एक अखंड पाठ,1100 कडधान्य वाटप आणि तीन दिवस भांडी घासण्याची तसेच भाविकांच्या चपला सांभाळण्याचे आदेश देण्यात आले. 


पंचानी सुनावल्या शिक्षेनंतर या व्यक्तीला मात्र चांगलीच अद्दल घडली असेल हे नक्की..