Viral Video : एकिकडे उत्तराखंडमध्ये पावसानं अडचणी वाढवल्यामुळं अनेक राष्ट्रीय महामार्गांवर दरडींचा धोका निर्माण झालेला असतानाच दुसरीकडे याच भागात एका भीषण अपघातानं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे. सध्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडच्या हरिद्वार येथे वीआयपी घाट परिसरामध्ये रविवारी सायंकाळी उशिराच्या सुमारास हा अपघात झाल्याचं म्हटलं जात असून, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद रोडवेजची एक बस पुलाचं रेलिंग तोडून थेट खाली कोसळली आणि या भीषण अपघातामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवशांना गंभीर दुखापत झाली. बस रेलिंग तोडून कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि ती जमिनीवर आदळली. ज्यानंतर घाबरलेल्या काही प्रवाशांनी बसच्या खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. 


हेसुद्धा वाचा : नरेंद्र मोदी ते शरद पवार..! 'या' भारतीय नेत्यांचे ट्विटवर आहेत सर्वाधिक फॉलोवर्स


 


पोलिसांच्या माहितीनुसार सदर अपघातानंतर कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ही बस उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून देहरादूनच्या दिशेनं निघाली होती. त्याचवेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट पुलावरून खाली कोसळली. यादरम्यान प्रवाशांना दुखापत झाली पण, सुदैवानं कोणतीही आणखी अप्रिय घटना मात्र घडली नाही. 




अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलीस यंत्रणा आणि बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचवलं. तर, अग्निशमन दलाच्या पथकानं बस हटवण्यातं काम हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. या अपघातामुळं सुरुवातीला या पुलाच्या परिसरा प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळाचं वाचावरण पाहायला मिळालं. पण काही तासांनंतर पोलीस दलानं परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.