नरेंद्र मोदी ते शरद पवार..! 'या' भारतीय नेत्यांचे ट्विटवर आहेत सर्वाधिक फॉलोवर्स

Twitter Most Followers List: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रेकॉर्ड रचला. एक्सवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते म्हणून (PM modi x followers) नरेंद्र मोदी यांची नवी ओळख निर्माण झालीये.

| Jul 15, 2024, 11:10 AM IST
1/5

पीएम नरेंद्र मोदी

एक्स प्लॅटफॉर्मवर पीएम नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 100 दशलक्ष झाली आहे. बराक ओबामा यांच्यानंतर सर्वाधिक फोलो केले जाणारे राजकीय नेते म्हणून मोदींना ओळखलं जाणार आहे.

2/5

राहुल गांधी

तर एक्स प्लॅटफॉर्मवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे 26.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची लोकप्रियता वाढलीये.

3/5

अरविंद केजरीवाल

तसेच तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नंबर लागतो. केजरीवाल यांचे 27.5 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.

4/5

अखिलेश यादव

तर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे 19.9 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर ममता बॅनर्जी यांचे 7.4 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.

5/5

शरद पवार

आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांचे 6.3 दशलक्ष फॉलोवर्स, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे 2.9 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.