मुंबई: गाझिपूर सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यातील केंद्र सरकारनं बदलेली धोरणं रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलकांची भेट घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाझिपूर सीमेवर विरोधकांचं शिष्टमंडळ गाझिपूर सीमेवर नुकतच पोहोचलं आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचाही समावेश आहे. सुप्रिया सुळे साधणार आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांवर ही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेत्यांनंतर आता विरोधकांचं शिष्टमंडळ घेत आहे.


 





शिवसेना नेते संजय राऊत यांनी गाझिपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे या चर्चा करणार आहेत.


शेतकरी देशाचे शत्रू आहेत का? - राहुल गांधी


शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. यावेळी त्यांसोबत चर्चा केली. शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्र सरकार या आंदोलनाला पाठिंबा देईल असं आश्वासन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं होतं. 


71 दिवसांपासून गाझिपूरसह दिल्लीतील वेगवेगळ्या सीमा भागांमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारनं लागू केलेली कृषी कायद्यातील धोरणं मागे घ्यावीत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.