नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून ( Farmers Protest) काँग्रसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरदार शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. शेतकरी देशाचे शत्रू आहेत का, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
जे काही चालले आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. शेतकरी शत्रू आहे का? शेतकरी देशाची शक्ती आहे. त्यांना दाबायचं, मारायचं आणि धमकी द्यायचं हे केंद्र सरकारचे काम नाही. सरकारचे काम शेतकऱ्यांशी चर्चा करणे असून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवण्याचे काम आहे. पण आज जे काही चालले आहे ते शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि देशाच्या हिताचं नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भारताच्या संरक्षण दलांसाठी पुरेशा निधींची तरतूद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील 99 टक्के जनतेच्या हिताचा नाही तर फक्त एक टक्के नागरिक असलेल्या दहा ते पंधरा उद्योगपतींसाठी तयार करण्यात आला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
China enters into India & grabs our land. What message do you give them? That we won't increase our Defence Expenditure. You raised it by Rs 3000-4000 Cr. What message did you give? That you can enter India & do whatever you want, we won't support our Defence Forces: Rahul Gandhi pic.twitter.com/pQRr6Ui8EW
— ANI (@ANI) February 3, 2021
आज थंडीत आमचे सैनिक तैनात आहेत आणि तुम्ही त्यांना पैसे देत नाहीत. हा कोणता राष्ट्रवाद आहे? ही कोणती राष्ट्रभक्ती आहे? असे सवाल राहुल यांनी यावेळी केलेत. चीनने भारताच्या हजारो किमीच्या जमिनीवर ताबा मिळवतो. पण तुम्ही चीनला बजेटमधून संदेश देतात की, संरक्षणासाठी जास्त पैशांची तरतूद करणार नाहीत. तीन-चार हजार कोटी रुपये तुम्ही वाढवले. तुम्ही चीनला नेमका संदेश काय दिला? तुम्ही आतमध्ये येऊ शकता. तुम्हाला जे कारयचंय ते करा. आम्ही आमच्या सेनेला पाठिंबा देणार नाहीत, अशी टीका केंद्र सकारवर त्यांनी यावेळी केली.