नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना 'पाक'राग आळवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात निवडणूक प्रचार दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या 'पाकिस्तानचं कट-कारस्थान' वक्तव्यावर टीप्पणी करताना फारुख यांनी मोदींवर जोरदार हल्ला करत त्यांचे आरोप फेटाळून लावलेत. 


'पंतप्रधान मोदी स्वत: पाकिस्तानात जेवण्यासाठी गेले होते... तेव्हा त्यांच्याविरोधात कुणी कट-कारस्थान केलं? पाकिस्तान कट-कारस्थान करत नाही' असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय. 


 

गुजरात निवडणुकीवर बोलताना 'काही लोकांनी वाचाळ बडबड टाळली असती तर काँग्रेस गुजरातमध्ये जिंकली असली' असंही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय. भाजपला टफ फाईट देण्याबद्दल अब्दुल्ला यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलंय.
शिवाय, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार कोणती नवीन गोष्ट नाही... इथं प्रत्येक वेळेला सरकार बदलतं, असंही त्यांनी म्हटलंय.