आता ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचं टेन्शनच नाही; पोर्टलवरच घ्या CAची मदत
आता इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणं सोपं काम झालं आहे.हे काम तुम्हाला आता ऑनलाईन देखील करता येईल. हे काम करण्यात कोणत्या अडचणी आल्या तरी, टेन्शन घेऊ नका
मुंबई : आता इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणं सोपं काम झालं आहे.हे काम तुम्हाला आता ऑनलाईन देखील करता येईल. हे काम करण्यात कोणत्या अडचणी आल्या तरी, टेन्शन घेऊ नका. यासाठी तुम्हाला चार्टर्ड अकॉउंटंन्ट (CA) शोधन्याची गरज नाही. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने तुम्हाला मोठा दिलासा दिला आहे.
इनकम टॅक्स विभागाने नवीन ई फाइलिंग पोर्टल 7 जूनपासून लॉंच केले आहे. या पोर्टलवर तुम्ही ITR फाइलिंग किंवा दुसऱ्या संबधित सेवांच्या मदतीसाठी CA किंवा अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क करू शकता. या माध्यमातून ITR फाइल करताना अडचणी आल्यास त्या सोडवता येतील.
ई-फाइलिंग पोर्टवल अतिशय सोप्या पद्धतीने My CA Service चा वापर करून तुम्ही एखाद्या CA ला जोडू शकता किंवा एखाद्या CA ला काढू देखील शकता. असाईन केलेले CA तुमची संपूर्ण मदत करतील. तसेच वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स देखील मिळत राहतील.
ई फायलिंग पोर्टलवर CA ची मदत कशी घेणार?
- ई फायलिंग पोर्टलवर CA सर्व्हिसेसचा फायदा घेण्यासाठी पुढील सोप्या प्रक्रीयेला फॉलो करा
1 यासाठी सर्वात आधी तुम्हाला इनकम टॅक्स विभागाच्या ई-फाइलिंग https://www.incometax.gov.in/iec/foportal/about-portal पोर्टल वर लॉग इन करणे गरजेचे आहे.
2 आता तुम्ही ऑथोराईज पार्टनर्समध्ये जाऊन My Chartered Accounts वर क्लिक करा.
3 आता Add CA वर क्लिक करा. आणि मेंबरशिप नंबर, चार्टर्ड अकॉउंटंन्टचे नाव आणि वॅलिडिशन इत्यादी माहिती भरा
4 आता संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर ICAI डेटाबेसच्या माध्यमातून वॅलिडिशन केल्यानंतर असाईन केलेल्या CA ची मदत घेऊ शकता.