मुंबई : गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्यावर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बॉलीवूड चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी गुगल, त्याचे सीईओ सुंदर पिचाई आणि गुगलच्या इतर पाच कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. इंतकाम आणि अंदाज यांसारख्या चित्रपटांचे निर्माते दर्शन यांच्या म्हणण्यानुसार, Google आणि त्यांच्या टीमने त्याच्या 2017 च्या दिग्दर्शित सिनेमा एक हसीना थी एक दीवाना थाच्या कॉपीराइटचे उल्लंघन केलंय.


Google ने काढण्यास दिला नकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WION मधील बातमीनुसार, सुनील दर्शन यांनी दावा केलायकी, त्यांनी हा चित्रपट अपलोड केला नाही किंवा कोणाला विकलेला नाहीये. तरीही हा चित्रपट अनेक YouTube चॅनेलवर उपलब्ध आहे. या संदर्भात गुगलशी बोलणं झालं असता त्यांनी संबंधित चॅनेलवरून चित्रपट काढून टाकण्यास नकार दिल्याचं त्यांनी म्हटलंय.


चित्रपट निर्मात्याने 1957 च्या कॉपीराइट कायद्याच्या कलम 51, 63 आणि 69 चे उल्लंघन केल्याबद्दल अंधेरी पूर्वमधील MIDC पोलीस स्टेशनमध्ये Google CEO आणि त्यांच्या टीमविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


दर्शन यांनी सांगितलं की, त्यांचा संपूर्ण चित्रपट गाण्यांसोबत यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. इतर लोकं माझ्या चित्रपटातून पैसे कमवतायत, ज्यांचा चित्रपटाशी काहीही संबंध नाही. 


गुगलने अनधिकृत व्यक्तीला 'एक हसीना थी एक दीवाना था' हा चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिल्याचं तक्रारीत म्हटलंय. यामुळे त्या इतरांनी करोडो रुपये कमावले असून आपलं करोडो रुपयांचे नुकसान झालं असल्याचं दर्शन यांचं म्हणणं आहे.