एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर फुलं विकणारी; आज अमेरिकेच्या टॉप विद्यापीठात करणार PhD
सरिता माळी यांचा जन्म मुंबईच्या झोपडपट्टीत झाला आणि तिचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत सुरू झाले. ती सध्या जेएनयूमधील भारतीय भाषा केंद्रात हिंदी साहित्यात पीएचडी करत आहे.
मुंबई : Sarita Mali Gets Admission in US University: एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर फुले विकणारी सरिता माळी आता विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी करणार आहे. तिला अमेरिकेतील सर्वोच्च विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला आहे. ती सध्या जेएनयूमधील भारतीय भाषा केंद्रात हिंदी साहित्यात पीएचडी करत असून तिने JNU मधून तिची एमए आणि एमफिल पदवी पूर्ण केली आहे आणि ती जुलैमध्ये पीएचडी सबमिट करेल. सरिताचा जन्म मुंबईच्या झोपडपट्टीत झाला आणि तिचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत सुरू झाले.
फुलं विकण्यापासून ते अमेरिकेच्या सर्वोच्च विद्यापीठात शिक्षण
सरिता माळीचे वडील मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील आहेत, त्यांनी उदरनिर्वाहाच्या शोधात मुंबई गाठली आणि तिथे रस्त्यावर फुले विकायला सुरुवात केली. वडिलांसोबत त्यांची मुलगी सरिता माळीही फुले व हार विकायची.
सरिता माळी म्हणतात की, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतो. प्रत्येकाला स्वतःची काही दुःख आणि अडचणी आहेत. तुमचा जन्म कोणत्या कुटूंबात किंवा कोणत्या समाजात झाला हे महत्वाचं नसून तुम्ही स्वतःसह समाज आणि कुटूंंबाच्या उद्धारासाठी किती परिश्रम घेता हे महत्वाचं असतं. दुर्दैवाने किंवा सुदैवाने माझा जन्म अशा समाजात झाला जिथे अडचणी हा माझ्या जीवनाचाच भाग होत्या.
वडिलांसोबत मुंबईच्या रस्त्यावर फुले विकायची
सण-उत्सवाच्या काळात सरिता वडिलांसोबत फुले विकायची. विशेषत: गणेश चतुर्थी, दिवाळी, दसरा यांसारख्या मोठ्या सणांना ती खूप उत्सुक असायची. शाळेत असताना वडिलांसोबत तिने हे काम केले आहे. जेएनयूमधून जेव्हा ती सुट्ट्यांमध्ये घरी जायची तेव्हा वडीलांना फुलाचा हार बनवण्यास मदत करीत असे. गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या आजारामुळे वडिलांचे काम ठप्प झाले होते. त्यावेळी त्यांच्या कुंटूंबाला मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागलं.
सरिता म्हणतात की, कुटूंबाच्या याच मेहनतीने, चिकाटीने, प्रामाणिकपणाने तिला आज इथपर्यंत पोहचण्यास प्रेरणा दिली आहे. सरिता माळी यांच्या कुटुंबात तिचे आई-वडील, मोठी बहीण आणि दोन लहान भावांसह 6 सदस्य आहेत. त्याचे वडील एकमेव कमावणारे आहेत. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे त्याचे वडील जौनपूरच्या बदलापूर येथे त्यांच्या घरी गेले होते.