ब्लीच करताना `या` गोष्टी लक्षात ठेवल्या तर कधीच होणार नाही त्रास!
Tips For Using Bleach : आता करा घरच्या घरी ब्लीज... या टीप्स जाणून घ्या तर कधीच होणार नाही त्रास आणि होऊल फायदा....
Tips For Using Bleach : चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. अनेक स्त्रीया या चेहऱ्यावरील त्यांचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी कधी पार्लरमध्ये जातात तर कधी डॉक्टरकडे जाऊन हजारो रुपयांच्या ट्रीटमेंट घेतात. पण काही लोक हे घरातील काही गोष्टी वापरत ग्लो टिकवून ठेवण्य़ाचा प्रयत्न करतात. त्यापैकी एक म्हणजे ब्लीचिंग. ब्लीचिंग हा चेहऱ्यावरची चमक लवकरात लवकर मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. चेहऱ्यावर ब्लीचिंग केल्याने चेहऱ्यावर चमक येते हे जरी खरे असले तरी ब्लीचिंग करताना काही गोष्टींची काळजी जर घेतली नाही, तर त्याने चेहऱ्यावर दुष्परिणामही होऊ शकतात.
एक गोष्ट तुम्हाला माहित असणं खूप महत्वाचे आहे की ब्लीच हे एक प्रकारचे केमिकल आहे, ज्याचा योग्यरीत्या वावर केला तर चेहऱ्यावर चमक येते, मात्र हे केमिकल निष्काळजीपणे वापरले गेले तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत, आज आपण घरी ब्लीच वापरताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेणार आहोत . जेणेकरून तुम्ही ब्लीचच्या चुकीचा वापराने होणारे दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता.
सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या
चेहऱ्यावर ब्लीच वापरण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ब्लीच करताना चेहऱ्यावर घाण साचली असेल तर त्याचे ब्लीचसोबतच मिश्रित होऊन तुम्हाला साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते हे जाणून घ्या.
लेयरवर विशेष लक्ष द्या
ब्लीच नेहमी तुमचा केसांच्या वाढीच्या दिशेने लावा. चेहऱ्यावर ब्लीच लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही फक्त तुमचा कपाळ, गाल आणि मानेवर ब्लीचचा जाड थर लावू शकता, परंतु उर्वरित चेहऱ्यावर फक्त पातळ थर लावा.
हेही वाचा : विशाखा सुभेदारच्या जागी 'हास्यजत्रेत' आलेल्या 'या' अभिनेत्रीसाठी Samir Choughule ची खास पोस्ट
ब्लीच वापरल्यानंतर फेसपॅक लावा
ब्लीच केल्यानंतर अनेकांना त्वचेवर जळजळ, खाज आणि लालसरपणा या समस्या निर्माण होतात. अशावेळी ब्लीचिंग केल्यानंतर चेहरा धुवून त्यावर चांगल्या दर्जाचा फेसपॅक लावा. जेणेकरून तुमचा चेहऱ्याला थंडावा मिळेल.
उन्हात जाणे टाळा
ब्लीच केल्यांनतरची एक गोष्ट टाळायला हवी ती म्हणजे उन्हात जाणे . ब्लीच लावल्यानंतर चुकूनही उन्हात जाऊ नका. वास्तविक, याचे कारण म्हणजे ब्लीच वापरल्यानंतर तुमची त्वचा खूप संवेदनशील होते. ज्यामुळे सूर्याहच अतितीव्र अशा UV किरणांमुळे तुमचा त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)