Gaganyaan Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अर्थात इस्रोकडून अतिशय महत्त्वाची माहिती देत आगामी गगनयान मोहिमेसंदर्भातील घोषणा केली. या मोहिमेनिमित्त भारताकडून मानवाला अंतराळात पाठवण्यात येणार असून, ते चार अंतराळवीर कोण असणार? यावरूनही पडदा उचलला. संपूर्ण देशभरात त्यानंतर या चार अंतराळवीरांची, त्यांच्या कामाची आणि त्यांच्या नावांची चर्चा सुरु झाली. यातच अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला. कारण, एक लोकप्रिय अभिनेत्री यापैकीच एका अंतराळवीराची पत्नी असल्याचंही नुकतंच उघड करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 फेब्रुवारी 2024 रोजी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मल्याळम अभिनेत्री लीनानं ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णनन नायरशी आपला विवाह झाल्याचं जाहीर केलं. इन्स्टाग्रामवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार लीना आणि प्रशांत नायर 17 जानेवारी 202 रोजी विवाहबंधनात अडकले होते. पण, त्यांनी नात्याची ग्वाही दिली नव्हती. अखेर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी गगनयान मोहिमेसाठी सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांची नावं जाहीर केली तेव्हा हीच संधी आणि हा आनंदाचा क्षण साधत तिनं ही गोड बातमी जाहीर केली. 


हेसुद्धा वाचा : Indian Railways : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; निवडणुकीआधी तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात 


पंतप्रधानांनी गगनयान मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या या चार test pilot ची नावं जाहीर करताच लीनाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिनं हेच क्षण सर्वांसमोर आणल आपण प्रशांत नायर याच्याशी विवाहबंधनात अडकल्याचंही जाहीर केलं. यावेळी चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अनेकांनीच लीना आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 



कोण आहेत ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर? 


इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडल्या गेलेल्या प्रशांत नायक यांचा जन्म केरळच्या तिरुवाझियादमध्ये 1976 मध्ये झाला होता. एनडीएमध्ये शिक्षणानंतर त्यांना भारतीय वायुदल अकादमीकडून मानाची तलवार बहाल करण्यात आली होती. 1998 मध्ये ते भारतीय वायुदसाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्या नावे साधारण 3000 तासांचा Flying अनुभव आहे. 


नायर यांच्याव्यतिरिक्त या मोहमेसाठी ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांच्याही नावाचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे.