नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधींजींची आज १४८ वी जयंती संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे साजरा होणार आहे. राजघाट येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.



आजच्या दिवशी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत अभियान' हे आपले महत्वाकांक्षी अभियान सुरू केले होते. अभियानाच्या तीन वर्षांनंतर गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय, सात वेगवेगळ्या गटांमध्ये २० व्यक्ती / एजन्सींना स्वच्छता पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेक्षाली एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री उमा भारती, हरदीप सिंग पुरी, एस.एस. अहलुवालिया आणि रमेश चंदप्पा गिगंजनी असे अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.