Gautam Adani Latest News: काही दिवसांपूर्वी अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा तथा चेअरमन गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आत्ताच्या नवीन यादीमध्ये मात्र, अदानींच्या स्थानामध्ये घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये (Bloomberg Billionaires Index) मात्र त्यांनी दुसऱ्या क्रमांकावरचं स्थान कायम ठेवलं आहे.


बर्नाड अर्नाल्ट पुन्हा दुसऱ्या स्थानी कायम...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम अदानी (Gautam Adani) एक दिवसाआधी 'ब्लूमबर्ग आणि फोर्ब्स' या दोन्हींच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांवर होते. पण फोर्ब्स रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्समध्ये त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावलं आहे. बर्नार्ड अर्नाल्टने (Bernard Arnault) पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. फेड रिझर्वच्या (Federal Reserve System) निर्णयानंतर बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळाली आहे.


अरबपतींच्या संपत्तीत घट...


यूएस मार्केटमध्ये (US Market) झालेल्या घसरणीमुळे टेस्ला (Tesla), गूगल (Google), अमेझॉन (Amazon), मायक्रोसॉफ्ट (Microsoft) या कंपन्यांच्या गुंतवणूकीत मोठ नुकसान झालं आहे. यामुळे स्थानिक बाजारात झालेल्या घसरणीचा फटका अरबपतींच्या संपत्तीवर देखील झाला. फोर्ब्स रिअल टाइम बिलेनियर इंडेक्समध्ये (Forbes Real Time Billionaires List) गौतम अदानी टॉप लूजरपैकी एक ठरले. एका दिवसात त्यांनी 4.7 अरब डॉलरची संपत्ती गमावली.


गौतम अदानी यांनी (Gautam Adani) 5.9 अरब डॉलरची संपत्ती गमावल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन तीसऱ्या क्रमांकावर आले आहेत. यानंतर त्यांची संपत्ती 153.6 अरब डॉलर शिल्लक राहीली आहे. त्याचबरोबर, बर्नार्ड अर्नाल्टच्या (Bernard Arnault) संपत्तीमध्ये 2.3 अरब डॉलरने वाढली आहे.