GK Quiz : आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. हातात मोबाईल आल्याने सर्व प्रश्नांची उत्तरं असोत किंवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती असो सहज उपलब्ध होते. पण परीक्षा किंवा मुलाखतीत मोबाईल ज्ञान उपयोगी पडत नाही. अशा वेळी तुम्ही वाचवलेलं पुस्तकी ज्ञान कामी येतं. यासाठीच तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आम्ही प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहे. यात असे काही प्रश्न विचारण्यात आले आहेत जे मनोरंजनाबरोबरच तुमच्या दैनंदिन आयुष्यातही फायदेशी ठरणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. एका क्लिकवर जगातील सर्व माहिती उपलब्ध होते. पण यामुळे वाचन कमी झालं आहे. याचे परिणाम आपल्याला स्पर्धात्मक परिक्षा किंवा मुलाखतीत पाहायला मिळतात. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी काही प्रश्न घेऊन आलोय. या प्रश्नांची आधी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, नंतर आपलं उत्तर बरोबर आहे की नाही यासाठी प्रश्नाचं उत्तर खाली दिलेलं आहे.


प्रश्न - भारतावर पहिलं परदेशी आक्रमण कोणी केलं होतं?


उत्तर - भारतावर पहिलं परदेशी आक्रमण सिकंदरने (Alexander) केलं होतं.


प्रश्न - माणसाच्या शरीरात किती टक्के रक्त असतं?


उत्तर - माणसाच्या शरीरात 7 टक्के रक्त असतं.


प्रश्न - यूनायडेट नेशन जनरल असेंबलीचं (United Nations General Assembly) हेडक्वार्टर कुठे आहे?


उत्तर - यूनायडेट नेशन जनरल असेंबलीचं हेडक्वार्टर न्यूयॉर्कमध्ये (New York) आहे.


प्रश्न - समुद्रातील अंतर मोजण्याचे एकक काय आहे?


उत्तर - समुद्रातील अंतर मोजण्याचे एकक नॉटिकल माईल (Nautical Mile) आहे.


प्रश्न - जगात असा कोणता देश आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय सीमा 14 देशांशी जोडलेली आहे?


उत्तर - जगातला तो देश चीन आहे. चीनची (China) आंतरराष्ट्रीय सीमा 14 देशांशी जोडली गेलेली आहे. यात अफगाणिस्तान, भूतान, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, लाओस, मंगोलिया, म्यांमार, नेपाळ, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रूस, ताजिकिस्तान आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.