Girl Dancing at Delhi Metro Video Viral : सध्या दिल्ली मेट्रो काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.  दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लच्या (bikini girl video) व्हिडीओनंतर दोन धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांसोबत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनपासून महिला आयोगाला धक्का बसला आहे. दिल्ली मेट्रोमधील एका तरुणाचा तरुणी शेजारी बसून हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर दोन तरुणांचा मेट्रोमध्येच ओरल सेक्सचा व्हिडीओने सगळ्यांनाच धक्का बसला. नेमकं दिल्ली मेट्रोमध्ये चाललय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रवाशांना मेट्रोमध्ये शिस्त पाळण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील दिल्ली मेट्रोमधील अजून एक तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर इंटरनेटवर संतापाची लाट पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणाई सोशल मीडियाचे वेड लागले आहे. प्रसिद्धी आणि पैसे कमावण्यासाठी ते बघ्यावं तिकडे रील्स आणि व्हिडीओ काढताना दिसतात. अगदी सार्वजनिक ठिकाणी डान्स करताना त्यांना जगाचा भानही राहत नाही. कधी शहरातील गजबजलेल्या मार्केटमध्ये तर कधी रेल्वे स्टेशनवर डान्स करताना दिसतात. मध्यतंरी मुंबई लोकल ट्रेनमध्येही (Mumbai Local Train) डान्स करतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. (girl dance video)


दिल्ली मेट्रोमधील तर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता हा व्हिडीओ बघा ना दिल्ली मेट्रोमध्ये एक तरुणी पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ही तरुणी शॉर्ट स्कर्ट घालून मेट्रोमध्ये डान्स करताना दिसून आली.  हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. 


@itz—officialroy या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तरुणीने मेट्रोमध्ये डान्स सुरु केल्यानंतर काही प्रवासी अवस्थ झाले. तर काही प्रवाशांचा तिने लक्ष वेधून घेतलं.


 


हेसुद्धा वाचा - Delhi Metro मध्ये तरुणांचं घाणेरडं कृत्य; विकृत तरुणांचा VIDEO VIRAL 


 


हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं आहे की, ''मला माहिती आहे याची परवानगी नाही, पण मी हे पहिल्यांदाच दिल्ली मेट्रोमध्ये असा डान्स केला आहे.'' 


 


हेसुद्धा वाचा - Viral Video : Local समोर ती बनवत होती Reel अन् मग...व्हिडीओ पाहून बसेल धक्का


 


व्हिडिओमध्ये ती मुलगी 'शेप बाय काका' या लोकप्रिय पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओ आतापर्यंत 44.4K लाइक्स मिळाले आहेत.  दिल्ली मेट्रोकडून प्रवाशांना वारंवार आवाहन केलं जात आहे की, सार्वजनिक ठिकाणी आणि दिल्ली मेट्रोमध्ये असे रील्स किंवा व्हिडीओ बनवू नका. मात्र प्रवाशांकडून या नियमाचं उल्लंघन होताना दिसत आहे.